समृद्धी महामार्ग वृक्षारोपण निविदा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:08 AM2021-03-20T04:08:06+5:302021-03-20T04:08:06+5:30

नागपूर : खळतकर कन्स्ट्रक्शन इन्फ्रा-रेनबो ग्रीनर्स या संयुक्त उपक्रम कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्यामुळे, ७०१ ...

Prosperity Highway Plantation Tender in Difficulty | समृद्धी महामार्ग वृक्षारोपण निविदा अडचणीत

समृद्धी महामार्ग वृक्षारोपण निविदा अडचणीत

googlenewsNext

नागपूर : खळतकर कन्स्ट्रक्शन इन्फ्रा-रेनबो ग्रीनर्स या संयुक्त उपक्रम कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्यामुळे, ७०१ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावर वृक्षारोपण करण्याच्या कामाची निविदा अडचणीत सापडली आहे.

समृद्धी महामार्गावर वृक्षारोपण केले जाणार असून, हे सुमारे ७५० कोटी रुपयांचे काम १५ भागात विभागण्यात आले आहे. त्या प्रत्येक भागात २६.५५ ते ६६.१४ कोटी रुपयाचे वेगवेगळे प्रकल्प आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या कामासाठी ४ डिसेंबर २०२० रोजी निविदा नोटीस जारी केली होती. त्याकरिता खळतकर-रेनबो संयुक्त उपक्रम कंपनीने पात्रतापूर्व बोली दाखल केली होती. ती बोली १९ फेब्रुवारी २०२१ रोजी नामंजूर करण्यात आली. हा निर्णय घेताना कोणतेही ठोस कारण देण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित वादग्रस्त निर्णय रद्द करून खळतकर-रेनबो कंपनीला निविदेच्या पुढच्या टप्प्यात सहभागी होण्याची परवानगी देण्यात यावी, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

-------------------

रस्ते विकास महामंडळाला नोटीस

या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग व नागपूर-मुंबई सुपर कॉम्युनिकेशन एक्सप्रेसवे कंपनी यांना नोटीस बजावून ३१ मार्चपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. राम हेडा यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Prosperity Highway Plantation Tender in Difficulty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.