नागपुरातील रेनबो लॉजमध्ये देहव्यापार; दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 11:23 IST2025-01-21T11:21:41+5:302025-01-21T11:23:36+5:30
Nagpur : ५१ हजार ८२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त

Prostitution at Rainbow Lodge in Nagpur; Two arrested
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कन्हान-मनसर मार्गावर असलेल्या रेनबो लॉजमध्ये देहव्यापार चालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कन्हान पोलिसांनी रविवारी (दि. १९) या लॉजवर धाड टाकली आणि दोघांना अटक करीत ५१ हजार ८२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मनोहर चिरकूट हूड (४७, रा. टेकाडी, ता. पारशिवनी) व वेदांत राजेंद्र लंगडे (१९, रा. रा. वहऱ्हाडा, ता. पारशिवनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मनोहर हूडचे टेकाडी शिवारात रेनबो नामक लॉज आहे. त्या लॉजवर देहव्यापार चालत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. त्यानंतर नियोजनबद्ध धाड टाकली.
या लॉजमध्ये शरीरसंबंधांसाठी रूम उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे तसेच तरुणींना आर्थिक आमिष दाखवून देहव्यापारासाठी बोलावले जात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी मालक मनोहर हूड व उपव्यवस्थापक वेदांत लंगडे या दोघांना ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी स्त्रिया व मुली अनैतिक देहव्यापारी प्रतिबंधक अधिनियम १९५६, कलम ३, ५ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
५१,८२४ रुपयांचा ऐवज जप्त
या कारवाई कन्हान पोलिसांनी ३० हजार रुपयांचा मोबाइल फोन, १६ हजार २२० रुपये रोख, ५,५३४ रुपयांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर, कंडोम, रजिस्टर असा एकूण ५१ हजार ८२४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. शिवाय, देहव्यापारासाठी लॉजवर बोलावलेल्या तरुणीची सुटकाही पोलिसांनी केली.