दोषी कंत्राटदारांना संरक्षण का?

By admin | Published: July 26, 2016 02:26 AM2016-07-26T02:26:54+5:302016-07-26T02:26:54+5:30

शहरातील उखडलेले रस्ते व खड्ड्यांची आदेशानुसार चौकशी करण्यात आली. यात शहरातील १८ रस्ते नादुरुस्त असल्याचे आढळून आले.

Protecting guilty contractors? | दोषी कंत्राटदारांना संरक्षण का?

दोषी कंत्राटदारांना संरक्षण का?

Next

कारवाई का नाही ? : तातडीने खड्डे बुजविण्याची गरज
नागपूर : शहरातील उखडलेले रस्ते व खड्ड्यांची आदेशानुसार चौकशी करण्यात आली. यात शहरातील १८ रस्ते नादुरुस्त असल्याचे आढळून आले. संबंतिध कंत्राटदारांना नोटीसही बाजवण्यात आल्या. परंतु यातील दोषींना पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे सरक्षण असल्याने अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.
पावसाळ्याला सुरुवात होताच शहरातील रस्ते उखडल्यासंदर्भात लोकांच्या तक्रारी असल्याने स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊ त यांनी शहरातील काही रस्त्यांची पाहणी केली होती. यात रस्त्यांवर खड्डे पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. याची गंभीर दखल घेत या रस्त्यांच्या कामाची सात दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी नगरयंत्री मनोज तालेवार यांना दिले होते. सोबतच शहरातील उखडलेल्या सर्वच रस्त्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अधीक्षक अभियंता उल्हास देबडवार यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहायक आयुक्तांनी रस्त्यांची चौकशी करून अहवाल सादर केला आहे. यात शहरातील १८ रस्त्यांवरील गिट्टी व डांबर उखडल्याचे नमूद केले आहे. नादुरुस्त रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याची गरज आहे.
दोषी चार कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. शहरातील उखडलेल्या रस्त्यांची संख्या विचारात घेता इतरांवर कारवाई अपेक्षित आहे. शहरातील शेकडो रस्ते नादुरुस्त असताना अहवालात केवळ १८ रस्त्यांचाच समावेश असल्याने या अहवालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्त्यांची उन्हाळ्यात दुरुस्ती व डांबरीकरण केले जाते.
पावसाळ्याला सुरुवात झाली की बहुसंख्य रस्त्यावरील गिट्टी बाहेर पडते. परंतु प्रभागातील नागरिक यासंदर्भात तक्रार करीत नाही. त्यामुळे हा प्रकार दरवर्षीचाच झाला आहे. (प्रतिनिधी)

दोषींवर कारवाईचे निर्देश
शहरातील प्रमुख रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात नादुरुस्त झाल्याच्या तक्रारी आहेत. याची दखल घेत शहरातील रस्त्यांची पाहणी केली. यात अनेक ठिकाणी रस्त्यावरील गिट्टी व डांबर उखडल्याचे निदर्शनास आले. प्रमुख रस्त्यांसोबतच अंतर्गत रस्त्यासंदर्भात अधीक्षक अभियंता यांना चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.
बंडू राऊ त, अध्यक्ष स्थायी समिती

Web Title: Protecting guilty contractors?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.