महिला अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:17 AM2021-09-02T04:17:19+5:302021-09-02T04:17:19+5:30

उमरेड/मोवाड/रामटेक/मौदा : अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी एका फेरीवाल्याने चाकूहल्ला केल्याने ...

Protest against attack on female officer | महिला अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध

महिला अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध

Next

उमरेड/मोवाड/रामटेक/मौदा : अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या ठाणे महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर सोमवारी एका फेरीवाल्याने चाकूहल्ला केल्याने त्यांची दोन बोटे तुटली. या घटनेचा नागपूर जिल्ह्यातील पालिका कर्मचाऱ्यांनी निषेध नोंदवीत मंगळवारी कामकाजावर बहिष्कार टाकला. नियम व कायदा मोडणाऱ्यांची ही गुन्हेगारी प्रवृत्ती अन्य ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणूक, अपशब्द, एकेरी भाषेचा उल्लेख योग्य नसल्याचे सांगत उमरेड पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रभारी उपमुख्याधिकारी धनराज पाटील यांच्याकडे निवेदन सोपविण्यात आले. यावेळी जगदीश पटेल, हरिश्चंद्र गवळी, मोहन नान्हे, दिलीप चव्हाण, संतोष बघेल, भरत मुळे, श्रावण गाठीबांधे, राजू लव्हे, शिवशंकर दांडेकर, स्वप्निल तुमडाम, विजय राऊत, दौलत मोहिते, राजेश मेश्राम, राकेश आंबिलडुके आदी उपस्थित होते. बुटीबोरी नगर परिषद येथे काम बंद आंदोलन करीत कर्मचाऱ्यांनी ठाणे येथील घटनेचा निषेध नोंदविला. याप्रसंगी आनंद नागपुरे, एस. बी. श्रीपदवार, मिलिंद पाटील, दिलीपसिंग भदोरिया, संजय पडोळे, महेश चिंचोळकर,नेहा वरभे, श्रद्धा इंगळे, दीक्षा मांडावगळे आदी कर्मचारी उपस्थित होते.

वाडी येथे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्या नेतृत्वात वाडी नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. महिला अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. याप्रसंगी उपमुख्याधिकारी रत्नमाला फटिंग, आकांक्षा पाटील, नंदन गेडाम, अशोक बोकडे, चेतन तुरणकर आदी कर्मचारी उपस्थित होते. मौदा पालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष गणेशनाथ नानवटकर, उपाध्यक्ष संदीप लाडे, सचिव अशपाकबेग मिर्झा आदी उपस्थित होते. मोवाड नगर परिषद येथील कर्मचाऱ्यांनी काळी फित लावून महिला अधिकाऱ्यावरील हल्ल्याचा निषेध नोंदविला. या आंदोलनात प्रशासकीय अधिकारी नितीन तापकीर, धनराज मानकर, दत्तात्रय चाटी, केशव कळंबे, विनोद बिलगये, स्वाती डखरे, लुकेश पाटील आदी कर्मचारी सहभागी झाले होते. रामटेक राज्य नगर परिषद संवर्ग कर्मचारी संघटनेचे सचिव गोविंद तुपट यांच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, कर विभाग प्रमुख महेंद्र जमदाडे, संगणक अभियंता विवेक कापगते, रमेश ईनवाते आदी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: Protest against attack on female officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.