मिरची उत्पादकांचे बाजार समितीसमाेर आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:09 AM2020-12-22T04:09:40+5:302020-12-22T04:09:40+5:30
रेवराल : हिरव्या मिरचीचे दर रात्री जाहीर हाेत असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हे दर राेज सकाळी ८ ...
रेवराल : हिरव्या मिरचीचे दर रात्री जाहीर हाेत असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येतात. त्यामुळे व्यापाऱ्यांनी हे दर राेज सकाळी ८ वाजता जाहीर करावे, या मागणीसाठी मिरची उत्पादकांनी माैदा कृषी उत्पन्न बाजार समितीसमाेर ठिय्या आंदाेलन केले.
व्यापाऱ्यांनी हिरव्या मिरचीचे दर सकाळी जाहीर केल्यास मिरची ताेडण्याची मजुरी ठरविणे शक्य हाेईल. मिरची ताेडायची की नाही हे ठरवता येईल. दर रात्री जाहीर केले जात असल्याने ताेडलेल्या मिरचीला भाव कमी मिळाल्यास नुकसान सहन करावे लागते, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. या आंदाेलनात जिल्हा परिषद सभापती तापेश्वर वैद्य, जिल्हा परिषद सदस्य याेगेश देशमुख, अनिल बुराडे, दीपक गेडाम, स्वप्नील श्रावणकर, ज्ञानेश्वर वानखेडे, राजेश ठवकर यांच्यासह शेतकरी सहभागी झाले हाेते.
...
शेतकऱ्यांचे नुकसान
बाजार समितीतील दलाल, व्यापारी व बाजार समिती व्यवस्थापन यांचे आपसात संगनमत असल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या मिरचीला याेग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान हाेते. बाजार समिती व्यवस्थापनाने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत मिरचीचे दर सकाळी जाहीर करावे. अन्यथा तीव्र आंदाेलन केले जाईल, असा इशाराही जिल्हा परिषद सदस्य याेगेश देशमुख यांनी दिला आहे.