आरएसएसशी संबंधित वीज कंत्राटी कामगार संघाचे ठिय्या आंदोलन

By आनंद डेकाटे | Published: August 24, 2024 06:40 PM2024-08-24T18:40:41+5:302024-08-24T18:43:02+5:30

Nagpur : ऊर्जामंत्र्यांच्या निवासावर काढला मोर्चा

Protest of RSS-affiliated Electricity Contract Workers group | आरएसएसशी संबंधित वीज कंत्राटी कामगार संघाचे ठिय्या आंदोलन

Protest of RSS-affiliated Electricity Contract Workers group

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आणि भारतीय मजदूर संघाशी संलग्नित महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर शनिवारी रेशीमबाग मैदानातून ऊर्जामंत्री यांच्या निवासस्थानी मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा संविधान चौकात अडवला. तेव्हा आंदोलकांनी चौकातच ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान मागणी पूर्ण होत नाही तोवर मागे हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. 

भारतीय मजदूर संघाशी संलग्नित महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्यांकडे कार्यरत कंत्राटी वीज कामगारांना सेवेत कायम करावे, वेतनवाढ व हरयाणा सरकार प्रमाणे वीज उद्योगात कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार देण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. शासनाकडेही बऱ्याचदा मागणी केली गेली. परंतु आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नाही.


दरम्यान, या वीज कंपन्यांतील सुमारे ४५ हजार कंत्राटी कामगारांच्या हक्कासाठी शेवटी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने शनिवारी रेशीमबाग मैदानातून थेट ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानावर दुपारी १२ वाजता मोर्चा काढला. आंदोलनात मोठ्या संख्येने कंत्राटी कामगार सहभागी झाले. हा मोर्चा संविधान चौकात पोलिसांनी रोखला. त्यानंतर आंदोलकांनी येथे ठिय्या देत आमरण उपोषण सुरू केले. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी फडणवीस यांच्याशी देवगिरीवर बैठक घडवून देण्याचे आश्वासन दिले. परंतु आंदोलनात महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात, सचिन मेंगाळे, उमेश आनेराव, राहुल बोडके, अभिजित माहुलकर यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

Web Title: Protest of RSS-affiliated Electricity Contract Workers group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर