सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या खासगीकरणाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 07:57 PM2020-06-10T19:57:23+5:302020-06-10T19:58:52+5:30
बुधवारी भामसं प्रणित नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स या संघटनांनी सरकारच्या खासगीकरणाचा निषेध केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारच्या बँकिंग, कोळसा, पोलाद, विमान वाहतूक, टेलिकॉम आदी सार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात भारतीय मजदूर संघ एकवटला आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी ‘सार्वजनिक उद्योग वाचवा, देश वाचवा’ हे अभियान भारतीय मजदूर संघ राबविणार आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी भामसं प्रणित नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स या संघटनांनी सरकारच्या खासगीकरणाचा निषेध केला. संघटनेचे म्हणणे आहे की, दहा बँकांचे चार मोठ्या बँकेत विलीनीकरण केल्याने सार्वजनिक क्षेत्राप्रमाणे बँकिंग उद्योग धोक्यात येऊ शकते. संघटनेने प्रातिनिधिक स्वरूपात निषेध नोंदवून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी संघटनेचे संयुक्त सचिव नीलेश भवाने, विक्की दहीकर, विघ्नेश पाध्ये आदी उपस्थित होते.