नागपूर श्रमिक पत्रकार संघाकडून नाना पटोले समर्थकांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2019 09:40 PM2019-04-07T21:40:53+5:302019-04-07T21:43:05+5:30

नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचे समर्थक असलेले काही नेते व कार्यकर्ते सोशल मीडियावर पत्रकारांना धमक्या देत आहेत. या कृतीचा नागपूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व नागपूर प्रेस क्लब यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

Protest of supporters of Nana Patole from Nagpur union of working Journalist | नागपूर श्रमिक पत्रकार संघाकडून नाना पटोले समर्थकांचा निषेध

नागपूर श्रमिक पत्रकार संघाकडून नाना पटोले समर्थकांचा निषेध

Next
ठळक मुद्देपत्रकारांना धमक्या आणि शिवीगाळ सोशल मीडियावर बदनामी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचे समर्थक असलेले काही नेते व कार्यकर्ते सोशल मीडियावर पत्रकारांना धमक्या देत आहेत. तसेच, त्यांना बदनामीकारक शिवीगाळही केली जात आहे. या खालच्या पातळीवरील कृतीचा नागपूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व नागपूर प्रेस क्लब यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
पत्रकार सरिता कौशिक, रजत वशिष्ठ, रश्मी पुराणिक व राजीव खांडेकर यांना पटोले समर्थकांनी आतापर्यंत लक्ष्य केले. पटोले व त्यांच्या समर्थकांचे पत्रकारांसोबतचे हे वागणे धक्कादायक आहे. पत्रकार नागरिकांपुढे सत्य बाजू मांडत असल्यामुळे झालेला जळफळाट यातून दिसून येत आहे. पत्रकार अशा भ्याड कृतीला कधीच घाबरणार नाहीत. ते आपल्या कर्तव्यांना सतत न्याय देत राहतील. प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्याला नुकसान पोहचविण्याचे काम पटोले समर्थक करीत आहे. त्यांच्या या कृतीचे कधीच समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यांची कृती फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे पटोले व त्यांच्या समर्थकांनी तात्काळ पत्रकारांची माफी मागावी. तसेच, पोलिसांनी दोषी समर्थकांचा शोध घेऊन त्यांना दंडित करावे व पत्रकारांची बदनामी करणारी खोटी छायाचित्रे प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ व नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर व महासचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

 

Web Title: Protest of supporters of Nana Patole from Nagpur union of working Journalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.