वाढत्या महागाईविराेधात कामगारांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:08 AM2021-09-11T04:08:53+5:302021-09-11T04:08:53+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धाेरणामुळे महागाईत वाढ झाली आहे. या धाेरणाच्या निषेधार्थ व ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : केंद्र व राज्य शासनाच्या चुकीच्या धाेरणामुळे महागाईत वाढ झाली आहे. या धाेरणाच्या निषेधार्थ व महागाई विराेधात कामगारांनी डिफेन्स परिसरातील आयुध निर्माणी अंबाझरी गेट क्रमांक-३ समोर गुरुवारी (दि. ९) निदर्शने केली. या आंदाेलनात भारतीय मजदूर संघ व आयुध निर्माणी महासंघाचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले हाेते. जाेवर सरकार ही महागाई व मूल्यवृद्धी नियंत्रणात आणत नाही, ताेवर आंदाेलन सुरूच राहणार असल्याचे कामगार नेत्यांनी सांगितले.
केंद्र व राज्य सरकारने आवश्यक वस्तू अधिनियमाचे संशोधन करून पेट्रोल, डिझल व घरगुती वापराच्या गॅसवर जीएसटी लावावी, एक देश एक कर या धाेरणाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी आयुध निर्माणी मजदूर संघाचे अध्यक्ष महावीरसिंह व्यास यांनी केली. या कामगारांनी भर पावसात आंदाेलन करीत शासनाच्या विराेधात नारेबाजी केली.
आंदाेलनात भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघाचे संरक्षक ॲड. श्रीराम बाटवे, पर्यावरण मंचचे मुकुंद रंगदळे, सहसचिव आर.पी. चावरे, जिल्हा महामंत्री तथा सीईसी हर्षल ठोंबरे, सीईसी बंडू तिडके, आयुध निर्माणी मजदूर संघाचे अध्यक्ष महावीरसिंह व्यास, महामंत्री सचिन डाबरे, जेसीएम सदस्य अतुल चवरे, सचिन थोराने, संजय वानखेडे, ओ. पी. उपाध्याय, एन. आर. लाघवे, विनय इंगळे, दिलीप चिन्नोरे, आशिष चौधरी, एस. आर. चौधरी, अनिल धुर्वे, सुधीर सातपुते, महेश चरडे, जे. के. सिंह, तुषार सेलोकर, शिव शर्मा, नरसिंग नाथ, पवन तिडके, अनिल पटले, राजेंद्र परसुटकर, सोमेश द्विवेदी, अंजनी कुमार यांच्यासह कामगार सहभागी झाले होते.
090921\5356img_20210909_170052.jpg
फोटो