कोरोना रुग्णांसाठी अतिरिक्त १००० खाटांची व्यवस्था करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:08 AM2021-03-23T04:08:33+5:302021-03-23T04:08:33+5:30
नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, रुग्णालयात १००० अतिरिक्त खाटांची संख्या वाढविण्याचे निर्देश ...
नागपूर : नागपुरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, रुग्णालयात १००० अतिरिक्त खाटांची संख्या वाढविण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सोमवारी मनपा प्रशासनाला दिले.
शहरात दररोज २५०० ते ३००० नागरिक कोरोनाबाधित होत आहेत, तसेच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २४ हजाराच्या वर गेली आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता सध्या कार्यरत खासगी रुग्णालयांमध्ये अतिरिक्त कोविड बेड्सची संख्या वाढविण्याकरिता परवानगी देण्यात यावी, सोबतच शहरातील नॉन कोविड हॉस्पिटललला कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी. इंदिरा गांधी रुग्णालया(मेयो)मध्ये वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, तेथे अतिरिक्त डॉक्टर्स व कर्मचारीवर्गाची नियुक्ती करण्यात यावी. मनपाचे पाचपावली येथील स्त्री रुग्णालयात कोविड रुग्णांकरिता तळमजल्यावर व्यवस्था करण्याचे निर्देश महापौरांनी दिले.