शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:08 AM2021-02-24T04:08:26+5:302021-02-24T04:08:26+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काटाेल : गेल्या काही महिन्यापासून शहरात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा हाेत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...

Provide clean and regular water supply | शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा

शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करा

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काटाेल : गेल्या काही महिन्यापासून शहरात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा हाेत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी सिटीझन फाेरमच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसीलदार अजय चरडे यांच्याकडे निवेदन साेपविले आहे.

काटाेल पालिकेने वाढीव पाणीपुरवठा याेजनेंतर्गत शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा (ऑटाेमायझेशन ॲटाेमॅटिक) कार्यान्वित करण्याकरिता कामे सुरू केली आहेत. यामुळे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातच गेल्या काही महिन्यापासून अनियमित व अशुद्ध पाणीपुरवठा हाेत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. घरगुती नळांना येणाऱ्या पाण्यावर पिवळा तवंग येत असून, पाण्याची चवदेखील बदलली आहे. यामुळे नागरिकांच्या आराेग्यास धाेका निर्माण झाला असून, लहान मुलांना उलटी, हगवणीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने वेळीच उपाययाेजना करून शहरात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदन देताना सिटीझन फाेरमचे प्रा. विजय कडू, भूपेंद्र चरडे, डाॅ. अनिल ठाकरे, प्रताप ताटे, मनाेज जवंजाळ, ॲड. मुकुल दुधकवळे, नागरिक कृती समितीचे ॲड. नीलेश हेलाेंडे, गणेश चन्ने, पं.स. सदस्य नीलिमा ठाकरे, गणेश सावरकर, मुन्ना पटेल आदी उपस्थित हाेते.

याबाबत पालिकेचे सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून शहरात पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यादृष्टीने ऑटाेमायझेशनचे काम सुरू आहे. त्याचा शहरातील पाणीपुरवठ्यासाठी नक्कीच फायदा हाेणार आहे. यात बरेच काम पूर्ण झाले असून, लवकरच पाणीपुरवठा सुरळीत सुरू हाेईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Provide clean and regular water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.