नागपूर विभागातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुविधा पुरवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 10:12 PM2018-02-08T22:12:40+5:302018-02-08T22:14:42+5:30

आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी येथे अधिकाऱ्यांना दिले.

Provide facilities to tribal ashram schools in Nagpur division | नागपूर विभागातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुविधा पुरवा

नागपूर विभागातील आदिवासी आश्रमशाळांमध्ये सुविधा पुरवा

Next
ठळक मुद्देविष्णू सवरा यांचे निर्देश : ३१ मार्चपर्यंत निधी खर्च करा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी येथे अधिकाऱ्यांना दिले. तसेच नागपूर विभागातील जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०१७-१८ चा निधी येत्या ३१ मार्च २०१८ पर्यंत खर्च करावा, अशा सूचनाही केल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात गुरुवारी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विभागातील आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०१८-१९ चे जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना प्रारूप आराखड्यास मान्यता व सन २०१७-१८ चा झालेल्या खर्चाच्या आढावाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, सहसचिव सुनील पाटील, विभागीय आयुक्त अनुप कुमार, नागपूर विभागाचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे उपसचिव ल. गो. ढोके, सु. ना. शिंदे, आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त डॉ. माधवी खोडे, उपायुक्त एस. डब्ल्यू. सावरकर, विभागीय आयुक्त कार्यालयातील नियोजन उपायुक्त बी. एस. घाटे, वरिष्ठ संशोधन अधिकारी मिलिंद नारिंगे, नियोजन अधिकारी अमित सुतार उपस्थित होते.
नागपूर विभागातील प्रत्येक जिल्ह्याने जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत जिल्हानिहाय देण्यात आलेल्या अंदाजपत्रकानुसार नियोजन सादर केले. मागासवर्गीय कल्याण (विशेष क्षेत्र), गाभा क्षेत्र, बिगर गाभा क्षेत्र आणि नाविन्यपूर्ण क्षेत्र यानुसार जिल्हानिहाय नियोजन सादर करण्यात आले. आश्रमशाळांकडे जाणारे रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, आदिवासीबहुल गावांना वीज जोडणी पुरविणे, २४ तास पाण्याची उपलब्धता, याबाबत माहितीचा आढावा यावेळी घेण्यात आला.
नागपूर विभागासाठी ५६५.३९ कोटींचा प्रारूप आराखडा

जिल्हा              निधी
-----------------------------
नागपूर           ७१ कोटी ८४ लक्ष रुपये
वर्धा               २३ कोटी २३ लक्ष रुपये
भंडारा            १४ कोटी १६ लक्ष रुपये
गोंदिया         ७८ कोटी ३ लक्ष रुपये
चंद्रपूर           १३९ कोटी ६९ लक्ष रुपये
गडचिरोली     २३८ कोटी ४१ लक्ष रुपये
--------------------------------------
एकूण ५६५ कोटी ३९ लक्ष रुपये
-----------------------------------

Web Title: Provide facilities to tribal ashram schools in Nagpur division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.