लॉकडाऊनच्या काळात एसटीला आर्थिक मदत द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 08:15 PM2020-05-21T20:15:22+5:302020-05-21T20:17:19+5:30
लॉकडाऊनच्या काळात एसटीचे कर्मचारी अडकलेले विद्यार्थी, कामगारांना सेवा देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परंतु लॉकडाऊनमध्ये दर महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतनासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी कामगार संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनच्या काळात एसटीचे कर्मचारी अडकलेले विद्यार्थी, कामगारांना सेवा देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परंतु लॉकडाऊनमध्ये दर महिन्यात कर्मचाऱ्यांना वेतनासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी कामगार संघटनेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहेत.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेस ठप्प झाल्या आहेत. उत्पन्न बंद झाल्यामुळे एप्रिल महिन्यापासून कर्मचाºयांचे वेतन देण्यासाठी महामंडळाच्या प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मे महिन्यात ७ तारखेला मिळणारे वेतन अद्याप कर्मचाºयांना मिळाले नाही. एसटी महामंडळाचे कर्मचारी लॉकडाऊनच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. दुसºया राज्यात अडकलेले विद्यार्थी, महाराष्ट्रातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्यासाठी एसटीचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. दररोज महामंडळाचे २१ कोटीपेक्षा अधिक नुकसान होत आहे. एसटीला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने २ हजार कोटींची आर्थिक मदत क रावी, एसटीचे शासनात विलीनीकरण करावे आणि आरोग्य कर्मचाºयांप्रमाणे एसटीच्या कर्मचाºयांना ५० लाखांचा विमा देण्याची मागणी एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, नागपूर प्रादेशिक सचिव अजय हट्टेवार यांनी केली आहे.