शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या : पालकमंत्री बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:49 PM2019-02-04T22:49:00+5:302019-02-04T22:49:44+5:30
जंगलाशेजारी असलेल्या शेतपिकांचे रोही व रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांमुळे नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसंदर्भात नुकसानभरपाई तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी घेतला. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जंगलाशेजारी असलेल्या शेतपिकांचे रोही व रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांमुळे नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसंदर्भात नुकसानभरपाई तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी घेतला. त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र्र खजांजी, वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला, अविनाश ठाकरे, चरणसिंग ठाकूर, सुभाष जैस्वाल, उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे आदी उपस्थित होते.
काटोल-नरखेड तसेच कोंढाळी परिसरातील शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांवर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यासंदर्भात वन विभागातर्फे योग्य मोबदला मिळावा यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले होते. शेतकऱ्यांचे वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासंदर्भात आवश्यक उपाययोजना करताना शेतकऱ्यांच्या शेतपिकासह पशुधन नुकसानीसंदर्भातही शासनाच्या विहीत निर्णयानुसार शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाच्या नुकसानीची भरपाई निर्धारित कालावधीत देण्यात यावी. तसेच नुकसानभरपाईसंदर्भातील केलेला पंचनामा व आर्थिक मदतीबाबतची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांच्या नुकसानीसंदर्भात एप्रिल ते जानेवारीपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ६८२ प्रकरणांची नोंद झाली असून शेतपिकांच्या नुकसानीपोटी ३ कोटी ३७ लाख ४८ हजार ५४० रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक उमरेड-दक्षिणमध्ये १ हजार ३८२ प्रकरणात ८१ लाख ५४ हजार २६५ रुपये, काटोल तालुक्यात १७७ प्रकरणात १७ लाख ८८ हजार ५३६ रुपये व नरखेड तालुक्यात ६१५ प्रकरणात ९१ लाख ९४ हजार १०५ रुपयांचे नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
पशुधनाच्या नुकसानभरपाईसाठी ४०६ प्रकरणात ५० लाख ६० हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली असल्याची माहिती यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नरखेड शहरामध्ये बांधण्यात आलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिज बांधकामामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी रेल्वे क्रॉसिंगजवळ शासनाची जमीन अधिग्रहण करून नागरिकांना येण्या-जाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली. काटोल- नरखेड तालुक्यातील नवीन प्रस्तावित तलाव बांधकाम तातडीने सुरू करण्यात यावे.
शेतकºयांना वन्यप्राण्यांच्या नुकसानीची जेणेकरून उन्हाळ्यामध्ये नागरिकांना पाणी उपलब्ध राहील. निवडणुकांच्यापूर्वी प्रस्तावित असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती, तलावांची निर्मिती तसेच इतर प्रस्तावित कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केलीसुद्धा परंतु त्यांना २५ टक्के रक्कम न मिळाल्याबाबत शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना ती रक्कम मिळण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.
मौदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पिण्याची सोय तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच बंजारा समाजाच्या सांस्कृतिक भवनाकरिता लवकरच जागा मंजूर करण्यात येईल. याबाबत पालकमंत्र्यांनी सूचना दिल्यात. मिहान तसेच मेट्रो कामामध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळावा याबाबत प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.