खनिज निधीतून जीवनावश्यक वस्तूंच्या किट द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 09:02 PM2020-04-15T21:02:21+5:302020-04-15T21:04:15+5:30
रेशनकार्ड नसलेल्यांची यादी तयार करताना अनेक परिवार जीवनावश्यक किटपासून वंचित राहिले आहेत. अशा परिवारांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, त्यांना खनिज निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात यावे, या मागणीसाठी भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना आज भेटले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना लॉकडाऊनदरम्यान जीवनावश्यक वस्तूंची किट मिळाली नाही अशा व रेशनकार्ड नसलेल्यांची यादी तयार करताना अनेक परिवार जीवनावश्यक किटपासून वंचित राहिले आहेत. अशा परिवारांचे पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे, त्यांना खनिज निधीतून जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात यावे, या मागणीसाठी भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना आज भेटले.
या शिष्टमंडळात आ. अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. गिरीश व्यास, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, सहभागी झाले होते. शहर व जिल्ह्यातील ज्या परिवारांकडे रेशनकार्ड आहे, पण रेशन मिळाले नाही, अशा कार्डधारकांना जीवनावश्यक व आरोग्यविषयक वस्तूंच्या किट देणे आवश्यक आहे, अशी मागणीही या शिष्टमंडळाने केली आहे.