सौर कृषी प्रकल्पासाठी जमीन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:07 AM2021-01-23T04:07:47+5:302021-01-23T04:07:47+5:30
नागपूर : कृषी पंपांना दिवसाही विजेचा पुरवठा करण्यासाठी महावितरणने ग्रामपंचायतींना सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन देण्याची मागणी केली आहे. कंपनीने ...
नागपूर : कृषी पंपांना दिवसाही विजेचा पुरवठा करण्यासाठी महावितरणने ग्रामपंचायतींना सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमीन देण्याची मागणी केली आहे. कंपनीने ग्रामपंचायतींना २६ जानेवारीला होणाऱ्या आमसभेत या संदर्भात प्रस्ताव पारित करण्यास म्हटले आहे.
शनिवारी आयोजित बैठकीत महावितरणचे प्रभारी प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी विभागाचे मुख्य, अधीक्षक आणि कार्यकारी अभियंत्यांना नव्या कृषी वीज धोरणाची माहिती दिली. ते म्हणाले की, या धोरणाचा उद्देश पुढील तीन वर्षापर्यंत ग्राहक आणि शासनावर विना अतिरिक्त भार टाकता सर्व कृषी ग्राहकांना योजनाबद्ध पद्धतीने दिवसा आठ तास विजेचा पुरवठा करणे आहे. त्यानुसार कृषी पंपधारकांना थकबाकीत मोठा दिलासा मिळणार आहे. त्यांना विलंब शुल्क न भरता सप्टेंबर २०१५ पर्यंतची थकबाकी भरावी लागेल. पहिल्या वर्षी थकबाकी भरणाऱ्यांना ५० टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी ३० आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के अतिरिक्त सूट मिळेल. बैठकीत नागपूरचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, गोंदियाचे सुखदेव शेरकर, अमरावतीच्या सुचित्रा गुजर, चंद्रपूरचे सुनील देशपांडे आणि अकोलाचे मुख्य अभियंता अनिल डोये उपस्थित होते.
...........