चेंबरतर्फे प्रशासनाला ऑक्सिजन सिलिंडर व पल्स ऑक्सिमीटर प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:08 AM2021-05-09T04:08:16+5:302021-05-09T04:08:16+5:30
देशात कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. संसर्ग वाढल्याने औषधी, ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांना उपलब्ध होत नाहीत. अशा कठीणसमयी व्यापारी ...
देशात कोरोना महामारीची दुसरी लाट आली आहे. संसर्ग वाढल्याने औषधी, ऑक्सिजन सिलिंडर रुग्णांना उपलब्ध होत नाहीत. अशा कठीणसमयी व्यापारी आणि सामाजिक संस्था कोरोना लढाईत आपापले योगदान देत आहेत. चेंबरने मेयो हॉस्पिटलला ऑक्सिमीटर, टेम्परेचर गन, सॅनिटायझर कॅन व सॅनिटायझर बॉटल नि:शुल्क उपलब्ध करून दिल्या. तर नागपूर महानगरपालिकेला दोन ऑक्सिजन सिलिंडर दिले. चेंबरचे उपाध्यक्ष संजय के. अग्रवाल आणि सहसचिव उमेश पटेल यांनी ऑक्सिजन सिलिंडर मनपा अधिकारी दहीकर यांना सुपूर्द केले. याकरिता त्यांनी चेंबरचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. अश्विन मेहाडिया व रामअवतार तोतला म्हणाले, कोरोना महामारीचा काळ अत्यंत जीवघेणा व गंभीर आहे. नागरिकांनी आपापल्या स्तरावर आर्थिक व सामाजिक योगदान देऊन शासन व प्रशासनाची मदत करावी.