चंद्रशेखर आझाद यांना सुरक्षा द्या, भीम आर्मीची मागणी
By आनंद डेकाटे | Published: June 30, 2023 05:49 PM2023-06-30T17:49:02+5:302023-06-30T17:51:00+5:30
संविधान चौकात निदर्शने
नागपूर :भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद (रावण) यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी संविधान चौकात भीम आर्मीतर्फे निदर्शने करण्यात आली. चंद्रशेखर हे मागास, वंचितांचा आवाज उचलत असतात. त्यामुळे त्यांचे अनेक राजकीय शत्रू निर्माण झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांना सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
चंद्रशेखर आझाद यांनी त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत यापूर्वीच सुरक्षेची मागणी केली होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी काही अज्ञात लोकांनी त्यांच्यावर हल्ला रून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शासनाने याची गंभीर दखल घेत त्यांना तातडीने सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलनात प्रशांत बांसोड़, गणेश चाचेरकर, पंकज जसवंतकर,अमूल सेलकर,अर्पिता देशभ्रतार, योगेश कापसे, आस्तिक बागडे, वसंत पाटील, राहुल जगताप यांचा समावेश होता.