२४ तास पाणी द्या व बिल कमी करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:08 AM2021-01-25T04:08:26+5:302021-01-25T04:08:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहराला पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या ओसीडब्ल्यू कंपनीचे कंत्राट रद्द करून शहरातील सर्व भागांना २४ तास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराला पाणीपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या ओसीडब्ल्यू कंपनीचे कंत्राट रद्द करून शहरातील सर्व भागांना २४ तास पाणी उपलब्ध करावे, पाणी बिलात कपात करण्यात यावी. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शनिवारी संविधान चौकात धरणे देण्यात आले.
२०१२ मध्ये शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी ओसीडब्ल्यू कंपनीकडे दिली होती. हा प्रकल्प २०१७ पर्यंत पूर्ण करावयाचा होता. मात्र, आजही शहरातील अनेक भागात अर्धा तास मिळत आहे. काही भागांत टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. मनपाकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी असताता जलप्रदाय विभाग नफ्यात होता. मात्र, आता दवर्षी मनपाला १०० कोटी खर्च करावे लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पाणीदरात कपात न केल्यास शहराच्या विविध भागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आंदोलन करणार असल्याचा इशारा शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, मनपातील गटनेते दुनेश्वर पेठे, माजी गटनेते वेदप्रकाश आर्य आदींनी दिला.
यावेळी प्रशांत पवार, बजरंगसिंह परिहार, प्रकाश गजभिये, जानबाजी मस्के, दिलीप पणकुले, वर्षा श्यामकुळे, श्रीकांत शिवणकर, अशोक काटले, लक्ष्मी ताई सावरकर, विशाल खांडेकर, शैलेश पांडे, रवींद्र इटकेलवार, शैलेंद्र तिवारी, रवि पराते, नूतन रेवतकर, लीला शिंदे, चरणजितसिंग चौधरी, महेंद्र भांगे, सुरेश करणे, सुनील लांजेवार, साजिद अली, प्रज्ञा शीला घाटे, संजय तिवारी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.