लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी वितरणाची माहिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 10:11 PM2017-11-27T22:11:34+5:302017-11-27T22:18:05+5:30

Provide water distribution information to farmers in the area of ​​benefit | लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी वितरणाची माहिती द्या

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी वितरणाची माहिती द्या

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांचे अधिकाऱ्यांना निर्देशपेंच प्रकल्पांतर्गत रबी पिकासाठी पाणी मिळणार

आॅनलाईन लोकमत
नागपूर : पेंच सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पिकांसाठी एक पाळी पाणी देण्यासंदर्भात पाणी वाटपाचे नियोजन करून तीन दिवसाच्या आत पाणी वितरणासंबंधीची संपूर्ण माहिती पाणी वापर संस्थांसोबत शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे दिलेत.
पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केली होती. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र्र खजांजी, सिंचन विभागाचे मुख्य अभियंता बी.एस. स्वामी, अधीक्षक अभियंता ललित इंगळे, कार्यकारी अभियंता तुरखेडे, एस.जी. ढवळे उपस्थित होते.
पेंच नदीवर मध्यप्रदेश शासनाचे चौराई प्रकल्पाचे बांधकाम झाल्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्याचे नियोजन करताना सिंचनासाठी एक पाळी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ डिसेंबर ते ५ जानेवारीदरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन करा. तसेच पीक पध्दतीबाबतही कृषी विभागातर्फे संपूर्ण माहिती पोहचवावी.
रब्बी व खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात सर्वेक्षण करण्यात येईल. पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणानुसार नागपूर शहरासाठी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या  पाण्याचे नियोजन करावे. त्यानुसार पाण्याचा अपव्यय टाळण्याच्या दृष्टीने वॉटर आॅडिट करावे. शहरासाठी आवश्यक असणारे पाणी तसेच भूगर्भातील उपलब्ध पाणी याचा समन्वय ठेवून मॉल, उद्योग, आदींना पिण्याचे पाण्याचा वापर बंद करून तसेच अपव्यय टाळून पाण्याची बचत कशी करता येईल या संदर्भातील अहवाल एक महिन्यात सादर करावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्यात.
 ३,२०० कोटीचा आराखडा
पेंच प्रकल्पाच्या जलसाठ्यात निर्माण झालेली तूट भरून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी मध्यप्रदेशातील लेहघोगरी येथून टनेलद्वारे पाणी आणण्याचे नियोजन आहे. तसेच कन्हान नदीवर तीन बंधारे, तसेच नाग नदीवर बंधारा बांधून हे पाणी कालव्याद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहचविण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार २०० कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला असून हा प्रकल्प नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत घेण्यासंदर्भात नियोजन असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

नुकसानभरपाईची मागणी
पेंच प्रकल्पाअंतर्गतच्या लाभक्षेत्रामध्ये खरीप हंगामासाठी काही भागात पाणी न मिळाल्यामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी केली.

 

 

Web Title: Provide water distribution information to farmers in the area of ​​benefit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी