भांडण सोडवायला गेलेल्या पं.स. सदस्यावर रॉडने हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:09 AM2021-04-01T04:09:36+5:302021-04-01T04:09:36+5:30
वाडी : मित्रांचे क्षुल्लक कारणावरून होत असलेले भांडण सोडविण्यात मध्यस्थी करण्यास गेलेल्या पंचायत समिती सदस्यावर रॉडने जबर मारहाण केल्याने ...
वाडी : मित्रांचे क्षुल्लक कारणावरून होत असलेले भांडण सोडविण्यात मध्यस्थी करण्यास गेलेल्या पंचायत समिती सदस्यावर रॉडने जबर मारहाण केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. सुधीर आनंदराव करंजीकर (३०), रा. आठवा मैल असे जखमीचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार आरोपी आकाश रमेश मोहाडे व रोशन रमेश मोहाडे रा.आठवा मैल यांचे इतर मित्रांसोबत भांडण सुरू होते. दरम्यान, सुधीर करंजीकर यांनी मध्यस्थी करीत त्यांच्यातील वाद सोडविण्यास गेले असता आकाश व रोशनने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. यात सुधीर गंभीर जखमी झाला. याबाबत माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आकाश व रोशन मोहाडे यास ताब्यात घेतले. त्यांच्यावर भादंवि कलम ३२४, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या घटनेत आकाश रमेश मोहाडे याने अभिषेक ढोके यास तू येथून निघून जा असे म्हटले असता मोनू गायकवाड व गोलू उईके दोन्ही रा.आठवा मैल यांनी आकाश मोहाडे व रमेश मोहाडे यांना रॉडने महारहाण करून जखमी केले. पोलिसांनी याप्रकरणी कलम ३२४, ३३ अन्वये गुन्ह्याची नोंद करून आरोपी मोनू गायकवाड व गोलू उईके यांना अटक केल्याची माहिती ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली. पुढील तपास वाडी पोलीस करीत आहेत.