‘पीएसआय’ उद्योजकांच्या फायद्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 01:21 AM2018-07-05T01:21:06+5:302018-07-05T01:21:54+5:30
लाभांशची प्रोत्साहन योजना (पीएसआय) आणि औद्योगिक सुरक्षितता व आरोग्य संचालनालयाच्या (डीआयएसएच) कार्यपद्धती उद्योजकांसाठी फायद्याच्या असल्याचे प्रतिपादन उद्योग विभाग, नागपूरचे सहसंचालक ए.पी. धर्माधिकारी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाभांशची प्रोत्साहन योजना (पीएसआय) आणि औद्योगिक सुरक्षितता व आरोग्य संचालनालयाच्या (डीआयएसएच) कार्यपद्धती उद्योजकांसाठी फायद्याच्या असल्याचे प्रतिपादन उद्योग विभाग, नागपूरचे सहसंचालक ए.पी. धर्माधिकारी यांनी केले.
बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या (बीएमए) वतीने पदाधिकारी आणि सदस्यांसाठी ‘पीएसआय’ आणि ‘डीआयएसएच’ यावर जीएसटीचा परिणाम, या विषयावर कार्यशाळेचे आयोजन असोसिएशनच्या बुटीबोरी येथील सभागृहात करण्यात आले. मंचावर बीएमएचे अध्यक्ष नितीन लोणकर, सचिव मिलिंद कानडे आणि औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, नागपूर विभागाच्या उपसंचालिका पल्लवी गंपावार उपस्थित होते.
धर्माधिकारी यांनी पीएसआय-२०१३ च्या पात्रतेसाठी असलेली गुंतागूंत आणि सध्याच्या स्थितीत जीएसटीचा परिणाम यावर विस्तृत सांगितले. त्यांनी वुमन पॉलिसी, एससी व एसटी पॉलिसी, लॉजिस्टिक पार्क पॉलिसी आणि इंडस्ट्रीयल पार्क पॉलिसीची माहिती दिली.
गंपावार यांनी उद्योगांना फॅक्टरी अॅक्टमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन केले. या कायद्याच्या अटी व नियम त्यांनी समजावून सांगितले. उद्योजकांनी या कायद्याचे पालन करण्यासाठी असोसिएशनला सहकार्याचे आवाहन केले.
लोणकर यांनी सदस्यांना ‘पीएसआय’ आणि ‘डीआयएसएच’च्या आवश्यकतेवर माहिती दिली. मिलिंद कानडे यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले आणि कार्यशाळेची माहिती दिली. यावेळी बीएमएचे सदस्य युवराज व्यास, प्रदीप राऊत, निष्ठा खंडेलवाल, प्रवीण चौरसिया, राकेश खुराणा, सी.पी. सरकार, जीवन धीमे, प्रशांत मेश्राम, अल्केश सराफ आणि एस.एम. कुळकर्णी तसेच रॅपिड लुब्रिकंट, रिलायन्स पॉवर, कॅल्डिय्स इंडिया, स्पेसवुड, इंडोरामा सिंथेटिक, शिल्पा स्टील या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीए मिलिंद कानडे यांनी आभार मानले.