नागपुरात बुलेटच्या धडकेत पीएसआय गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 01:01 AM2018-08-08T01:01:42+5:302018-08-08T01:02:35+5:30

बुलेटचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे कर्तव्यावर असलेला एक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गंभीर जखमी झाला. विजय मधुकर गीते असे जखमी पीएसआयचे नाव असून, ते वाहतूक शाखेच्या चेंबर ४ मध्ये कार्यरत आहेत. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयभीम चौकाकडून हसनबागकडे जाणाऱ्या मार्गावरील उदय लॉनसमोर मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

PSI seriously injured in bullet hit in Nagpur | नागपुरात बुलेटच्या धडकेत पीएसआय गंभीर जखमी

नागपुरात बुलेटच्या धडकेत पीएसआय गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देनंदनवनमध्ये गुन्हा दाखल : बुलेटचालकासह दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुलेटचालकाने जोरदार धडक मारल्यामुळे कर्तव्यावर असलेला एक पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) गंभीर जखमी झाला. विजय मधुकर गीते असे जखमी पीएसआयचे नाव असून, ते वाहतूक शाखेच्या चेंबर ४ मध्ये कार्यरत आहेत. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयभीम चौकाकडून हसनबागकडे जाणाऱ्या मार्गावरील उदय लॉनसमोर मंगळवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपींची नावे मोहम्मद उबेर मोहम्मद इद्रिस (वय २०) आणि निहाल अख्तर मोहम्मद अनिस अन्सारी (वय २२) अशी आहेत. हे दोघेही इस्लामपुºयातील येरखेडा मशिदीजवळ राहतात. ते आठवडी बाजारात रेडिमेड कपडे विकण्याचा व्यवसाय करतात, अशी पोलिसांची माहिती आहे.
हेल्मेटसक्ती कारवाईच्या संबंधाने पीएसआय गीते, हवालदार चंद्रकांत लक्ष्मण पाचोरे आणि त्यांचे सहकारी मंगळवारी सकाळी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत उदय लॉनजवळ हजर होते. समोरून येणारी बुलेट (एमएच ४०/ बीएम ७७०१) वेगात येताना पाहून आणि बुलेटचालकाने हेल्मेट घातले नसल्याचे दिसल्याने पीएसआय गीते यांनी चालकाला हात दाखवून थांबण्याचा इशारा दिला. मात्र, आरोपी उबेर याने बुलेटचा वेग कमी केला नाही. त्याने तशाच वेगात बुलेट दौडवली. समोर गीते आडवे झाल्याचे पाहून त्याने त्यांच्या अंगावर बुलेट घातली. त्यामुळे पोट आणि कोथ्याला जबर मार बसून गीते खाली पडले. मागे बसलेला आरोपी निहाल याने तशाही अवस्थेत आरोपी उबेरला बुलेट पळविण्याचा इशारा केला. त्यामुळे पळून जाण्याच्या प्रयत्नात बुलेट अनियंत्रित होऊन दोन्ही आरोपी खाली पडले. त्यामुळे ते किरकोळ जखमी झाले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या पीएसआय गीतेंना प्रारंभी बाजूच्या इस्पितळात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांची अवस्था बघून त्यांना तातडीने दुसरीकडे हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे गीतेंना आॅरेंज सिटी इस्तिपतळात दाखल करण्यात आले. हवालदार पाचोरे यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी उबेर तसेच निहालविरुद्ध कलम ३०७ (जीव घेण्याचा प्रयत्न), ३५३ (सरकारी कामात व्यत्यय) आणि अन्य कलमांसह गुन्हा नोंदविला आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस दलात रोष
वाहतूक शाखेच्या उपनिरीक्षकाला बुलेट चालकाने जाणीवपूर्वक धडक मारून गंभीर जखमी केल्याचे वृत्त झपाट्याने शहरात पसरले. त्यामुळे पोलीस दलात रोष निर्माण झाला. मोठ्या संख्येत पोलीस अधिकारी, कर्मचारी इस्पितळात पोहचले. माहिती कळताच पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, परिमंडळ ४ चे उपायुक्त नीलेश भरणे, उपायुक्त चिन्मय पंडित यांनीही आॅरेंज सिटी इस्पितळात जाऊन जखमी गीतेंच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांशी चर्चा केली. गीतेंची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत.

आक्रमकता अंगावर आली
गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक पोलिसांनी हेल्मेटसक्तीची विशेष कारवाई मोहीम शहरात राबविणे सुरू केले आहे. त्यानुसार, गेल्या दोन दिवसांत पोलिसांनी १११५ दुचाकीचालकांवर कारवाई केली. अनेक ठिकाणी वाहतूक शाखेचे पोलीस कारवाईची नको तेवढी आक्रमकता दाखवतात. आजच्या घटनेला अशीच आक्रमकता पीएसआय गीतेंनी दाखविली. ती त्यांच्या अंगावर आली.

 

Web Title: PSI seriously injured in bullet hit in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.