पं. नेहरू हे प्रगत भारताचे शिल्पकार

By admin | Published: May 28, 2016 02:52 AM2016-05-28T02:52:43+5:302016-05-28T02:52:43+5:30

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील प्रगत भारताचे शिल्पकार होते,

Pt Nehru is the architect of the advanced India | पं. नेहरू हे प्रगत भारताचे शिल्पकार

पं. नेहरू हे प्रगत भारताचे शिल्पकार

Next

कृष्णकुमार पांडे : देवडिया भवनात आदरांजली, शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम
नागपूर : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील प्रगत भारताचे शिल्पकार होते, असे मनोगत अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे संघटक कृष्णकुमार पांडे यांनी येथे व्यक्त केले. नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने देवडिया काँग्रेसभवनात पंडित नेहरू यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून पांडे हे आपली आदरांजली व्यक्त करीत होते.
या प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सचिव अतुल कोटेचा, तानाजी वनवे, यशवंत कुंभलकर, डॉ. गजराज हटेवार, विजय बाभरे, नगरसेवक वासुदेव ढोके, अरुण डवरे यांनीही पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आपली आदरांजली वाहिली. यावेळी बंडोपंत टेंभुर्णे, रत्नाकर जयपूरकर, जयंत लुटे, राजकुमार मोटघरे, प्रा. अनिल शर्मा, मेहश श्रीवास, घनश्याम मांगे, पंकज निघोट, विलास बांगरे, प्रवीण आगरे, प्रभाकर खापरे, एम. एम. शर्मा, पंकज थोरात, किशोर जिचकार, कुमार बोरकुटे, वासुदेव ढोके, नरेश चौधरी, रामू घाडगे, दिलीप काळबांडे, इब्राहीम चुडीवाला, सर्फराज खान, रत्नमाला फोपरे, मीनाक्षी साखरे, प्रभुदास तायवाडे, वसंत बनकर, गजानन सावरकर आदी उपस्थित होते.
या प्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांनाही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. गजराज हटेवार यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Pt Nehru is the architect of the advanced India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.