पं. विष्णू पलुसकर स्मृती सांगितिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:12 AM2021-08-28T04:12:27+5:302021-08-28T04:12:27+5:30
नागपूर : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक, गायक, स्वरलिपिचे निर्माते पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन ...
नागपूर : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक, गायक, स्वरलिपिचे निर्माते पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन आलाप संगीत विद्यालयात करण्यात आले.
आलापचे अध्यक्ष श्याम निसळ यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पारंपारिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक विद्यालयाचे संचालक अंजली निसळ यांनी केले. त्यानंर की-बोर्डवर राम थिटे यांचे सादरीकरण झाले. आर्यन चौहान व हार्दिक उईके यांनी तबलावादन केले. नृत्य शिक्षिका उर्मिला राऊत यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी कथ्थक नृत्याची प्रस्तुती दिली. यात गुरुवंदना, गणेश वंदना, गतनिकास, तराना, भजन, कालिया मर्दन, बाँट आदी शास्त्रीय नृत्य प्रकारांचे सादरीकरण झाले. यात भक्ती तरुडकर, तनुष्का अतकरे, समृद्धी खोलगडे, चैताली, वेदिका गुरव, अवनी, सानवी, स्वराली, स्वरा, अवंतिका, अनन्या, शर्वरी, सुरभी, पलक, कीर्ती भिसीकर, आदिश्री, अवंती, भावना या विद्यार्थ्यांचा समावेश होता. निवेदन साक्षी दिडपाये यांनी केले तर आभार चैताली जीवतोडे यांनी मानले. यावेळी तबला शिक्षक मनोज घुशे, कस्तुरी निसळ, कनक निसळ उपस्थित होते.
..............