येरखेडा येथे म्युकरमायकोसिसवर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:08 AM2021-05-31T04:08:06+5:302021-05-31T04:08:06+5:30
कामठी : जिल्हा प्रशासनाने कामठी तालुक्यात काेराेना संक्रमणासाेबतच म्युकरमायकाेसिस या आजाराची जनजागृती करायला सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत येरखेडा ...
कामठी : जिल्हा प्रशासनाने कामठी तालुक्यात काेराेना संक्रमणासाेबतच म्युकरमायकाेसिस या आजाराची जनजागृती करायला सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत येरखेडा (ता. कामठी) येथील ग्रामपंचायत भवनात कार्यक्रमाचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी श्याम मदनूरकर, तहसीलदार अरविंद हिंगे, खंडविकास अधिकारी अंशुजा गराटे, जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, पंचायत समिती सभापती उमेश रडके, सरपंच मंगला कारेमोरे, माजी सरपंच मनीष कारेमोरे, उपसरपंच शोभा कराडे उपस्थित होते. उपविभागीय महसूल अधिकारी श्याम मदनूरकर यांनी कोरोना संसर्ग व म्युकरमायकाेसिसची लागण याबाबत माहिती दिली. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना या आजाराची लागण हाेण्याची अधिक शक्यता असल्याने त्यांच्यासह इतरांनी त्यांनी विशेष काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर फिरणे टाळावे, मास्कचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच सॅनिटायझरचा नियमित वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळत असल्याने पुढील काही महिने प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. या आजाराची लक्षणे आढळल्यास तत्काळ उपचार घ्यावेत, असे आवाहन तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशासेविका व नागरिक उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी जितेंद्र डावरे यांनी केले.