जनता कर्फ्युमुळे ‘एसटी’ला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:19 AM2020-09-20T01:19:45+5:302020-09-20T01:21:02+5:30

शनिवारी नागपूर शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळे बहुतांश नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्याचा फटका गणेशपेठ आगाराला बसला. आगारातून दररोज ४५० फेऱ्या जातात. परंतु कर्फ्यूमुळे केवळ २४३ फेऱ्या गेल्यामुळे एसटीचे नुकसान झाले.

Public curfew hits ST | जनता कर्फ्युमुळे ‘एसटी’ला फटका

जनता कर्फ्युमुळे ‘एसटी’ला फटका

Next
ठळक मुद्दे प्रवासी झाले कमी : गणेशपेठ आगाराला १.५० लाख नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शनिवारी नागपूर शहरात जनता कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळे बहुतांश नागरिक घराबाहेर पडले नाहीत. त्याचा फटका गणेशपेठ आगाराला बसला. आगारातून दररोज ४५० फेऱ्या जातात. परंतु कर्फ्यूमुळे केवळ २४३ फेऱ्या गेल्यामुळे एसटीचे नुकसान झाले.
कोरोनामुळे एसटीची चाके थांबली होती. त्यानंतर उत्पन्न वाढविण्यासाठी एसटीने बसेसचे ट्रकमध्ये रुपांतर करून माल वाहतूक सुरूकेली. खासगी गाड्यांचे टायर रिमोल्ड करून देण्याची योजना आखली. महाराष्ट्र शासनाने आदेश दिल्यानंतर एसटीने प्रवासी वाहतुक सुरू केली. परंतु २२ प्रवाशांची मर्यादा असल्यामुळे एसटीला नुकसान झाले. शक्रवारपासून बसेस पूर्ण क्षमतेने वाहतूक करण्याची परवानगी एसटीला मिळाली. पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु शनिवारी नागपुरात जनता कर्फ्यू लावण्यात आला. त्यामुळे बहुतांश प्रवाशांनी प्रवास करण्याचे टाळले. त्यामुळे गणेशपेठ आगारातून ४५० पैकी फक्त २४३ फेऱ्या जाऊ शकल्या. आगाराला यामुळे १.५० लाखाचा फटका बसला. रविवारीही जनता कर्फ्युमूळे एसटीला नुकसान होणार असल्याची शक्यता एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

जनता कर्फ्यूमुळे एसटीच्या अनेक फेºया रद्द कराव्या लागल्या. गणेशपेठ आगाराला १.५० लाखाचे नुकसान झाले. रविवारी एसटीला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.
-अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार.

Web Title: Public curfew hits ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.