प्रकाश आंबेडकर यांची १ मार्चला रामटेकमध्ये जाहीर सभा
By आनंद डेकाटे | Published: February 26, 2024 05:31 PM2024-02-26T17:31:28+5:302024-02-26T17:32:20+5:30
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे नेहरू ग्राउंडवर शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता बहुजन सत्ताधिकार महासभा आयोजित करण्यात आलेली आहे.
नागपूर : बहुजनांनी स्वतःचे प्रश्न सोडविण्यासाठी बहुजनांचे बहुमत निर्माण करून बहुजनांची सत्ता" या देशात स्थापन करावी हा उद्देश समोर ठेवून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाहीर महासभांचा झंजावात सुरू केला आहे. याअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे नेहरू ग्राउंडवर शुक्रवार १ मार्च रोजी दुपारी ३ वाजता बहुजन सत्ताधिकार महासभा आयोजित करण्यात आलेली आहे.
या महासभेला एड. प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करतील, अशी माहिती वंचितचे जिल्हाध्यक्ष दिलीप दुपारे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली. या सभेला किमान १ लाख लोकं उपस्थित राहतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रपरिषदेला मनिष बोरकर, अजय सहारे, विश्रांती रामटेके, विवेक हाडके, प्रफुल माणके, सिध्दांत पाटील, अभिजीत पडघान, यश कुंभारे, राहुल भिमटे, विनय उमाटे, मुरलीधर मेश्राम, मिलिंद मेश्राम, पदाधिकारी उपस्थित होते.