सार्वजनिक प्रकल्प उत्पन्नाचे स्त्रोत व्हावेत ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:03+5:302021-06-22T04:07:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा आज पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतला. महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा आढावा आज पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतला. महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत तसेच यापुढे सार्वजनिक उपक्रमाच्या प्रकल्पांमधून महानगरपालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर महानगर विकास प्राधिकरणचे (एनएमआरडीए) सभापती मनोज सूर्यवंशी, नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब देशमुख, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये उपस्थित होते. या बैठकीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत येणाऱ्या निवासी सदनिकांमधील नागरिकांच्या समस्यांवर चर्चा झाली.
बॉक्स
डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालयाचा होणार पुनर्विकास
डॉ.राममनोहर लोहिया वाचनालय हे नागपूर शहरातील एक प्रतिष्ठित व चोवीस तास सुरू असणारे मनपाचे वाचनालय आहे. या वाचनालयात दररोज सातशे ते आठशे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याकरिता येतात. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि अपुरे नियोजन लक्षात घेता पालकमंत्री राऊत यांनी संपूर्ण वाचनालयाचा पुनर्विकास करण्याचे निर्देश दिले. तसेच लष्करीबागेतील बाजीराव साखरे ई-वाचनालयात विद्यार्थ्यांना स्वच्छ शौचालय, सुरक्षेकरिता सुरक्षारक्षक, उपहारगृह, वाचनालय परिसरातील सौंदर्यीकरण, विद्यार्थांना अभ्यासाकरिता लागणारी पुस्तके, साहित्य, २४ तास वीज पुरवठा, अभ्यासाकरिता इंटरनेटची सुविधा आणि ज्येष्ठ नागरिकांकरिता वाचन कक्षाची निर्मिती करण्याचे निर्देश दिले.