गुगल मॅपवर दिसणार नागपुरातील सार्वजनिक शौचालये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 11:53 AM2019-10-29T11:53:43+5:302019-10-29T11:54:11+5:30

नागपूर शहरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालये गुगल मॅपवर एसबीएम टॉयलेट या नावाने दिसणार आहेत.

Public toilets in Nagpur will appear on Google Maps | गुगल मॅपवर दिसणार नागपुरातील सार्वजनिक शौचालये

गुगल मॅपवर दिसणार नागपुरातील सार्वजनिक शौचालये

Next
ठळक मुद्दे शहरात ओडीएफ डबल प्लस मानांकनासाठी दर्जेदार सुविधा द्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हागणदारीमुक्तीत शहराला ओडीएफ प्लस मानाकंन प्राप्त झाले आहे. आता सर्वोच ओडीएफ प्लस प्लस मानांकन प्राप्त व्हावे, यासाठी महापालिकेची यंत्रणा कार्यरत झाली आहे. शहरातील सर्व सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोबतच शहरातील सार्वजनिक व सामुदायिक शौचालयेही गुगल मॅपवर एसबीएम टॉयलेट या नावाने दिसणार आहे.
शहरातील शौचालये गुगल मॅपवर दिसल्यास लोकांना त्याचा फायदा होणार आहे. तसेच तक्रार नोंदविण्यासाठी शौचालयात तक्रार नोंदवही ठेवली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची व अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली. यात आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वच्छतेसंदर्भात कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गंभीर असावे. यात हलगर्जीपणा केल्याचे आढळुन आल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
नागपूर शहराला ओडीएफ प्लस मानांकन मिळाले आहे. आता शहराला ओडीएफ प्लस प्लस हे मानांकन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक शौचालयामागे एक नोडल अधिकारी, जमादार, स्वच्छता कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे.
या सर्व कर्मचाऱ्यांवर त्यांच्या झोनल अधिकारी व सहायक आयुक्तांनी नियंत्रण ठेवावयाचे आहे. बहुसंख्य शौचालयात पाण्याची व्यवस्था नसल्याने दुर्गंधी पसरते. त्यामुळे शौचालयातील नळाला पाणी उपलब्ध करण्याचे निर्देश जलप्रदाय विभागाला देण्यात आले आहे.
शौचालयात ओलसरपणा राहणार नाही यासाठी फरशी कोरडी करून स्वच्छ ठेवा,तसेच कचरापेटीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहे. पाणी गळतीची जागा शोधून त्याठिकाणी डागडुजी करण्यात यावी, संबंधित कार्यकारी अभियंत्यांनी या गोष्टींकडे लक्ष देण्याचे निर्देश अभिजित बांगर यांनी दिले आहेत.

Web Title: Public toilets in Nagpur will appear on Google Maps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल