प्रकाशकांना पक्षीकोश छापायला नको असतो; मारुती चितमपल्लींची खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 04:22 PM2018-02-09T16:22:48+5:302018-02-09T16:24:22+5:30
मी तब्बल १२ वर्षे कठोर परिश्रम घेऊन पक्षीकोश, प्राणीकोश लिहिले. पण ललित लेख छापायला आतूर असलेल्या प्रकाशकांना माझे अभ्यासपूर्ण कोश छापायचे नसतात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मी तब्बल १२ वर्षे कठोर परिश्रम घेऊन पक्षीकोश, प्राणीकोश लिहिले. पण ललित लेख छापायला आतूर असलेल्या प्रकाशकांना माझे अभ्यासपूर्ण कोश छापायचे नसतात. ते त्याला नकार देतात. कारण असे पक्षीकोश छापायला पैसे खूप लागतात. मग त्यांची किंमत वाढते आणि ग्राहक मिळत नाहीत. मी शासनाला विनंती केली की ते पक्षीकोश तुम्ही छापा, किंवा अनुदान द्या, जेणेकरून त्याची किंमत कमी होईल व ते जास्तीजास्त लोक वाचू शकतील. पण शासन नुसतेच बोलते करत काहीच नाही.. ही खंत आहे ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांची.
नागपुरात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व एमसीएएलतर्फे आयोजित ग्रामायन या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यासंदर्भातील अधिक वृत्त लवकरच देत आहोत.