जिल्ह्यात १७ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:10 AM2020-12-30T04:10:04+5:302020-12-30T04:10:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना साथरोगाच्या काळामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करीत येत्या १७ जानेवारी रोजी शून्य ते ५ ...

Pulse polio vaccination in the district on 17th January | जिल्ह्यात १७ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण

जिल्ह्यात १७ जानेवारीला पल्स पोलिओ लसीकरण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना साथरोगाच्या काळामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करीत येत्या १७ जानेवारी रोजी शून्य ते ५ वर्ष या वयोगटातील प्रत्येक मुलाला पोलिओचा डोज देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे याांनी सोमवारी दिले. यापूर्वी डोज दिला असेल तरी पुन्हा देण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आरोग्य विभागाने केलेला आराखडा आज चर्चिला गेला. १७ जानेवारीला जिल्ह्यात ही मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी नियोजन आखण्यात आले आहे. या माेहिमेसााठी ३ लाख २० हजार पोलिओ लसीची माागणी करण्यात आली आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना ही लस पुरविली जाईल. आरोग्य व ग्रामीण पातळीवर ६ हजार ९७ कर्मचारी या मोहिमेसाठी तैनात करण्यात आले आहेत.

बॉक्स

शेवटचा रुग्ण २००१ मध्ये

नागपूर जिल्ह्यामध्ये याापूर्वी शेवटचा पोलिओ रुग्ण सन २००१ मध्ये आढळून आला होता. तेव्हापासून आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नाही. तो रुग्ण महापालिका क्षेत्रात आढळला हाेता. ग्रामीण भागात १९९८ मध्ये शेवटचा रुग्ण मौदा तालुक्यात सापडला होता, तर महाराष्ट्रात अंबेजोगाई तालुक्यात २०१० मध्ये शेवटचा रुग्ण आढळला होता.

Web Title: Pulse polio vaccination in the district on 17th January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.