Pulwama attack:पेट्रोल पंप बंद ठेवून शहिदांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:27 PM2019-02-20T23:27:16+5:302019-02-20T23:29:51+5:30
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना शहरात विविध संघटनांतर्फे कॅन्डल मार्च आणि दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली देण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी नागपूर शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांनी सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी पंप सायंकाळी ७ ते ७.२० मिनिटांपर्यंत बंद ठेवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांना शहरात विविध संघटनांतर्फे कॅन्डल मार्च आणि दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली देण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी नागपूर शहरासह जिल्ह्यातील पेट्रोल पंपचालकांनी सीआरपीएफ जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी पंप सायंकाळी ७ ते ७.२० मिनिटांपर्यंत बंद ठेवले.
विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दहशतवादी कृत्याची कठोर शब्दात निंदा केली. ते म्हणाले, वीर शहिदांनाा श्रद्धांजली देण्यासाठी कन्सॉर्टियम ऑफ इंडियन पेट्रोल पंप डीलर्स असोसिएशनच्या (सीआयपीडीए) आवाहनार्थ नागपूर जिल्ह्यातील पेट्रोल पंप २० मिनिटे बंद ठेवून पेट्रोल व डिझेल विक्री बंद करण्यात आली. यादरम्यान जिल्ह्यातील २४५ पंपासह
नागपुरातील ८६ पंपांवरील लाईट बंद ठेवून शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या माध्यमातून पेट्रोल पंप संचालक व कर्मचारी देशातील शहिदांच्या कुटुुंबीयांसोबत असल्याचा संदेश देण्यात आला.