पंपावर हेल्मेट आणि रस्त्यावर?
By Admin | Published: July 23, 2016 02:56 AM2016-07-23T02:56:35+5:302016-07-23T02:56:35+5:30
रस्ते सुरक्षा आणि अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी चालवणारे व मागे बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.
रस्ते सुरक्षा आणि अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकी चालवणारे व मागे बसणाऱ्या दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. ‘हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही’, असा नियम करण्यात आल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केले. परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतर पेट्रोल मिळणार नाही या भीतीने उपराजधानीत दुचाकी चालकांनी पंपावर हेल्मेट घातले. मात्र वाहतूक पोलिसांची मोहीम नसल्याचे लक्षात आल्यावर झाशी राणी चौकात दुचाकी चालकांनी विना हेल्मेट प्रवास केला. अपघातात नागरिकांचे प्राण जाऊ नयेत म्हणून सरकारने हेल्मेट सक्ती केली आहे. मग ती पंपावर असो वा रस्त्यावर, हेल्मेट हे सुरक्षेसाठीच असते हे या सुजाण नागपूरकरांना सांगणार कोण ?