नागपूर मेट्रो उभारणार पुण्याची मेट्रो

By Admin | Published: October 16, 2016 02:31 AM2016-10-16T02:31:26+5:302016-10-16T02:31:26+5:30

राज्यात नागपूर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जात आहे.

Pune metro will be built in Pune | नागपूर मेट्रो उभारणार पुण्याची मेट्रो

नागपूर मेट्रो उभारणार पुण्याची मेट्रो

googlenewsNext

नागपुरात बनणार कोचेस :
राज्य सरकार व चीनच्या कंपनीत सामंजस्य करार
नागपूर : राज्यात नागपूर, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जात आहे. दोन दिवसांपूर्वी पुणे मेट्रो रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे नागपुरात मेट्रो रेल्वे उभारण्याचे काम सुपर फास्ट गतीने सुरू असल्यामुळे पुण्यातील रेल्वे उभारण्याचे कामही नागपूर मेट्रो रेल्वे कार्पोरेशन लि. ला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत शनिवारी नागपूर मेट्रो रेल्वेसाठी नागपुरातच रोलिंग स्टॉक तयार करण्याकरिता महाराष्ट्र सरकार व चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कार्पोरेशन (सीआरआरसी) दरम्यान सामंजस्य करार झाला. याच वेळी कार्यस्वीकृती पत्र (एलओए) हस्तांतरण सोहळाही पार पडला. सामंजस्य करारावर राज्य सरकारतर्फे विकास आयुक्त (उद्योग) विजय सिंघल व सीआरआरसी तर्फे उपमहाव्यवस्थापक (ओव्हरसीज बिझनेस डिव्हिजन) झाऊ चुआनची यांनी तसेच एलओए वर एनएमआरसीएलतर्फे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रोलिंग स्टॉक) जनक कुमार गर्ग व सीआरआरसी तर्फे संचालक, (इंटरनॅशनल सिस्टीम एशिया अ‍ॅण्ड नॉर्थ अमेरिका डिपार्टमेंट) चेनचुंग टिंग यांनी स्वाक्षरी केली. यावेळी खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, खा. कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर कोहळे, आ. विकास कुंभारे, एनएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, प्रधान सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात आजवर बऱ्याच ठिकाणी मेट्रो रेल्वे प्रकल्प उभारण्यात आले. मात्र, त्यासाठी लागणारा रोलिंग स्टॉक आयात करण्यात आला.

Web Title: Pune metro will be built in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.