पुणे-नागपूर, पुणे-अजनी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:04 AM2020-11-29T04:04:32+5:302020-11-29T04:04:32+5:30
नागपूर : रेल्वे प्रशासनाने १ डिसेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. यात नागपूरवरून धावणाऱ्या तीन रेल्वेगाड्यांचा ...
नागपूर : रेल्वे प्रशासनाने १ डिसेंबरपासून नव्या वेळापत्रकानुसार विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. यात नागपूरवरून धावणाऱ्या तीन रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. या गाड्या नागपूर-पुणे, अजनी-पुणे दरम्यान धावणार आहेत.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२०४१ पुणे-नागपूर सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी प्रत्येक गुरुवारी रात्री १० वाजता पुण्यावरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १.१० वाजता नागपूरला पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२०४२ नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रत्येक शुक्रवारी दुपारी ३.१५ वाजता नागपुूरवरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२५ वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी दौंड, मनमाड, चाळिसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा येथे थांबेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२२३९ पुणे-अजनी विशेष रेल्वेगाडी शनिवारी पुण्यावरून रात्री १० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता अजनीला पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२२४० विशेष रेल्वेगाडी रविवारी सायंकाळी ७.५० वाजता अजनीवरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.०५ वाजता पुणे येथे पोहोचेल. ही गाडी दौंड, कोपरगाव, मनमाड, चाळिसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा येथे थांबेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२२२३ पुणे-अजनी विशेष रेल्वेगाडी प्रत्येक मंगळवारी दुपारी ३.१५ वाजता पुण्यावरून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४.५० वाजता अजनीला पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०२२२४ विशेष रेल्वेगाडी अजनीवरून प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३५ वाजता पुण्याला पोहोचेल. ही गाडी दौंड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, धामनगाव, वर्धा येथे थांबणार आहे. या बदलाची नोंद घेऊन प्रवाशांची आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
...............