पुणे-नागपूर-पुणे गाडी होणार सुपरफास्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 08:19 PM2020-11-30T20:19:07+5:302020-11-30T20:19:44+5:30

Indian Railway Nagpur News मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणारी रेल्वेगाडी क्रमांक ०१४१७/०१४१८ पुणे-नागपूर-पुणे १ डिसेंबरपासून सुपरफास्ट होणार आहे.

Pune-Nagpur-Pune train will be superfast | पुणे-नागपूर-पुणे गाडी होणार सुपरफास्ट

पुणे-नागपूर-पुणे गाडी होणार सुपरफास्ट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातून धावणारी रेल्वेगाडी क्रमांक ०१४१७/०१४१८ पुणे-नागपूर-पुणे १ डिसेंबरपासून सुपरफास्ट होणार आहे. यासोबतच ही गाडी आता ०२०४१/०२०४२ या नव्या क्रमांकाने धावणार आहे. परंतु तांत्रिक बाबीमुळे हा क्रमांक सिस्टिममध्ये अद्याप नोंदविल्या गेला नाही. त्यामुळे नवा क्रमांक नोंदविल्या जाईपर्यंत ही गाडी जुन्या क्रमांकानुसार धावणार आहे. या गाडीत एक डिसेंबरपासून सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येणार आहे. या गाडीच्या थांब्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या गाडीत केवळ कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच प्रवास करू शकणार आहेत. प्रवाशांनी प्रवासादरम्यान मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

...........

Web Title: Pune-Nagpur-Pune train will be superfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.