रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्यामुळे दंडात्मक कारवाई

By मंगेश व्यवहारे | Published: June 6, 2023 04:00 PM2023-06-06T16:00:39+5:302023-06-06T16:01:18+5:30

५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३० हजार रुपयांचा दंड वसूल

Punitive action by Nagpur Municipal Corporation for spreading construction materials along the road | रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्यामुळे दंडात्मक कारवाई

रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्यामुळे दंडात्मक कारवाई

googlenewsNext

नागपूर : महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने ५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरूनगर झोनच्या पथकाद्वारे रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून इतवारी हॉस्पिटल मागील आशीर्वादनगर येथील सुरेश मून यांच्यावर कारवाई करीत १० हजार रुपये दंड वसूल केला.

धंतोली झोनच्या पथकाने कॉटन मार्केट येथील गुप्ता खोवा भंडार यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगल्या प्रकरणी कारवाई करीत ५ हजारांचा दंड वसूल केला. नरेंद्रनगर येथील मेडप्लस दुकानावर विद्युत खांबांवर विनापरवानगी जाहिरात लावल्या प्रकरणी कारवाई करीत ५ हजारांचा दंड वसूल केला. गांधीबाग झोन अंतर्गत हंसापुरी येथील श्री डेअरी यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगल्या प्रकरणी ५ हजारांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत इतवारी येथील पौनीकर किराणा स्टोर यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवी बाळगल्याप्रकरणी कारवाई करीत ५ हजारांचा दंड वसूल केला.

Web Title: Punitive action by Nagpur Municipal Corporation for spreading construction materials along the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.