नागपुरात पंजाब नॅशनल बँकेतील ग्राहकाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:50 AM2018-03-17T00:50:31+5:302018-03-17T00:50:42+5:30
पंजाब नॅशनल बँकेतील एका ग्राहकाच्या खात्यामधून १ लाख २१ हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंजाब नॅशनल बँकेतील एका ग्राहकाच्या खात्यामधून १ लाख २१ हजार रुपये परस्पर काढण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जरीपटका पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
कामगारनगर येथील हिरालाल मदने यांचे जरीपटका येथील पंजाब नॅशनल बँकेत दोन बतच खाते आहे. पोलीस सूत्रानुसार हिरालाल यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये एटीएममधून १० हजार रुपये काढले. त्यावेळी बचत खात्यामधील बॅलेंस पाहून त्यांना धक्का बसला.
बचत खात्यात कमी रक्कम शिल्लक असल्याचे आढळून आले. बँकेला सुटी असल्याने त्यांना खरा प्रकार समजला नाही. यानंतर काही वेळानंतरच त्यांच्या खात्यात ३५ हजार रुपये परत जमा झाले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी हिरालाल बँकेत पोहोचले. तेव्हा अधिकाºयांनी त्यांना एटीएम मागितले. हिरालाल यांनी एटीएम देताच ते तोडून डस्टबीनमध्ये टाकले. तसेच बँक खात्यातून जमा रक्कम काढण्याचा सल्ला दिला. नियमांची माहिती नसल्याने हिरालाल यांनी जमा रक्कम काढून टाकली. त्यांच्या खात्यामधून १ लाख २१ हजार ३९ रुपये परस्पर काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. हिरालाल यांनी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. सायबर सेलने हे प्रकरण जरीपटका पोलिसांकडे पाठवित तक्रार दाखल करण्यास सांगितले. गुरुवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.