खरेदी वाढल्याने सोने चकाकले!
By admin | Published: June 29, 2016 02:52 AM2016-06-29T02:52:20+5:302016-06-29T02:52:20+5:30
जगात अस्थिरतेचे वातावरण आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात प्रचंड घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे.
सहा महिन्यांत ५५०० रुपयांनी महाग : खरेदीच्या उत्साहावर विरजण
मोरेश्वर मानापुरे नागपूर
जगात अस्थिरतेचे वातावरण आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात प्रचंड घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे. मागणी व पुरवठ्यानुसार कमी पुरवठा आणि मागणी जास्त असल्यामुळे सोन्याच्या भावाने अचानक उसळली घेतली. पुढे सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता नसून ग्राहकांना जास्त भावातच सोने खरेदी करावे लागणार आहे.
लग्नसराईमुळे मौल्यवान धातू असलेल्या सोन्याच्या दरातील तेजी गेल्या आठवड्यात कायम राहिली. मंगळवारी स्थानिक बाजारात १० ग्रॅम सोन्याचे दर ३० हजार रुपयांवर स्थिरावले.युरोप आणि अमेरिका आर्थिक संकटात सापडल्याने गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे धाव घेतली आहे. ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा भारतीय बाजारपेठेवर मोठा परिणाम होणार आहे.
त्यादिवशी शेअर बाजार
घसरण झाल्यानंतर स्थानिक बाजारात सोने तब्बल १४०० रुपयांनी महाग होऊन भाव ३०,९०० रुपयांवर पोहोचले होते. गेल्या दोन वर्षातील सोन्याच्या किमतीत झालेली ही सर्वाधिक वाढ होती. नंतर दोनच दिवसात स्थानिक बाजारात मागणीअभावी सोने ३० हजारांपर्यंत खाली आले.