रेशन धान्याची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:12 AM2021-09-15T04:12:47+5:302021-09-15T04:12:47+5:30

--- कुही तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या १०४ आहे. तालुक्यात शेतकरी व शेतमजुरांची संख्या जास्त आहे. या सर्वामध्ये ...

Purchase of ration grains | रेशन धान्याची खरेदी

रेशन धान्याची खरेदी

Next

---

कुही तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांची संख्या १०४ आहे. तालुक्यात शेतकरी व शेतमजुरांची संख्या जास्त आहे. या सर्वामध्ये एकूण संख्येच्या ७६ टक्के लोकांना अंत्योदय व प्राधान्य गटात धान्य मिळते. तालुक्यातील कुही, मांढळ, वेलतूर, पचखेडी यासारख्या गावांत असलेले धान्य खरेदीदारांच्या फळीवर ग्राहक घेऊन जातो. तिथे गहू १५ रुपये किलो व तांदूळ १८ रुपये किलोप्रमाणे विकतात. म्हणजे दोन व तीन रुपये खरेदीचे धान्य पाच ते सहा पटीच्या भावात विकल्या जाते.

----

कामठी तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानातून धान्याच्या लाभ घेणारे लाभार्थीच चढ्या भावाने दलालाला सरकारी स्वस्त धान्याची विक्री करून काळाबाजार करीत आहेत. कामठी शहरात ७३ व ग्रामीण भागात ३३ असे एकूण १०६ सहकारी स्वस्त धान्य दुकानातून लाभार्थ्यांना धान्याचा पुरवठा करण्यात येतो. सरकारी स्वस्त धान्य दुकानातून ३ रुपये प्रति किलो तांदूळ तर २ रुपये किलो प्रति किलो गहू लाभार्थ्यांना विक्री करण्यात येते. महिन्याला सरकारी स्वस्त धान्य दुकानातून ४३२० क्विंटल तांदूळ तर ५ हजार क्विंटल गहू वितरित करण्यात येतो. त्यातील काही लाभार्थी चढ्या भावाने धान्याची विक्री करतात.

-

स्वस्त धान्य दुकानातील तांदूळ व गव्हाचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात लेखी तक्रारी प्राप्त झाल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई येईल.

संदीप शिंदे

तालुका पुरवठा अधिकारी, कामठी

Web Title: Purchase of ration grains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.