प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण, नीरीचे संशोधन  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 06:59 AM2020-01-19T06:59:19+5:302020-01-19T07:00:02+5:30

रमन विज्ञान केंद्रातील विज्ञान मेळाव्यात संस्थेच्या स्टॉलवर हे उपकरण सादर करून पहिल्यांदाच सार्वजनिक करण्यात आले आहे.

Pure air-purifying device, absorbing pollution | प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण, नीरीचे संशोधन  

प्रदूषण शोषून शुद्ध हवा सोडणारे उपकरण, नीरीचे संशोधन  

Next

- निशांत वानखेडे
नागपूर : हवेमधील धूलिकण, रासायनिक गॅस इतर घटकांमधून होणारे प्रदूषण शोषून शुद्ध हवा बाहेर सोडणारे एक उपकरण राष्टÑीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (नीरी) तयार केले आहे. पॅसिव्ह एअर रिज्युव्हेनेटिंग सिस्टीम (पार्स) असे या उपकरणाचे नाव असून, परिसरातील ८० टक्के हवा शुद्ध करण्याची त्याची क्षमता असल्याचा दावा नीरीच्या संशोधकांनी केला आहे.

रमन विज्ञान केंद्रातील विज्ञान मेळाव्यात संस्थेच्या स्टॉलवर हे उपकरण सादर करून पहिल्यांदाच सार्वजनिक करण्यात आले आहे. प्रकल्प सहायक यशश्री राऊत म्हणाल्या, उपकरणात कूलरप्रमाणे एक चेंबर तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये तळाला दोन फॅन आहेत. हे फॅन प्रामुख्याने हवेतील धूलिकण, धोकायदायक गॅसेस व प्रदूषणाचे इतर घटक शोषून घेण्याचे काम करतात. चेंबरमध्ये सुपीक माती, कोकोपीट, गांडूळखत व चिलासारख्या वनस्पतींच्या मिश्रणाची जाळी लावण्यात आली आहे. चेंबरवर हवा शुद्ध करणाऱ्या टरबूज, जेड, आफ्रिकन मास्क अशा सात ते आठ प्रकारच्या वनस्पती लावण्यात आल्या आहेत. फॅनद्वारे प्रदूषित घटक ओढून घेतल्यानंतर जाळीमध्ये धूलिकण, हानिकारक गॅसेस अडकतात.

नीरीने पार्स उपकरणाच्या पेटंटचा दावा केला असून, लवकरच त्यास मान्यता मिळेल. पर्यावरण कंपनीला संबंधित तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात आले असून, लवकरच ते सर्वत्र उपलब्ध होणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.

काय आहे हे उपकरण
या उपकरणात तळाला दोन फॅन आहेत. चेंबरमध्ये सुपीक माती व इतर मिश्रणाची जाळी लावली आहे. चेंबरच्या वर हवा शुद्ध करणाºया वनस्पती आहेत. फॅनद्वारे प्रदूषित घटक ओढून घेतल्यानंतर जाळीमध्ये धूलिकण, हानिकारक गॅसेस अडकतात आणि बाहेरील वनस्पतींच्या मदतीने शुद्ध हवा सोडली जाते.

Web Title: Pure air-purifying device, absorbing pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.