आपत्ती व्यवस्थापनाचा उद्देशच क्षमता विकसित करणे आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 10:28 AM2020-12-03T10:28:34+5:302020-12-03T10:29:13+5:30
Nagpur News . एनडीआरएफचे कमांडंट रमेश कुमार यांच्याशी लोकमतने बातचित केली असता, ते म्हणाले, एनडीआरएफला नैसर्गिक आपत्तबरोबरच रासायनिक, जैविक व रेडिओलॉजिकल व परमाणू युद्धात निर्माण झालेल्या आपत्तीच्या प्रसंगात तैनात रहावे लागते.
हार्दिक राय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद फोर्स (एनडीआरएफ) ही भारताची विशेष फोर्स आहे. देशावर येणाऱ्या आपत्तीच्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी या फोर्सची स्थापना आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये करण्यात आली आहे. एनडीआरएफचे कमांडंट रमेश कुमार यांच्याशी लोकमतने बातचित केली असता, ते म्हणाले आमचे काम राष्ट्राची बांधणी करण्याचे आहे.
रमेशकुमार म्हणाले २०२१ मध्ये कर्मचारी व स्वयंसेवकांसाठी ५४ अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल. एनडीआरएफद्वारे देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. एनडीआरएफद्वारे जनजागृती कार्यक्रमाबद्दल ते म्हणाले एनडीआरएफच्या सद्यस्थितीत केवळ १६ बटालियन आहे. त्यांना प्रशिक्षणासाठी अकादमीमध्ये पाठविण्यात येते. अकादमीद्वारे एनडीआरएफ व एसडीआरएफ कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनात बचावाचे कार्य कसे होते यासाठी मॉकड्रील करण्यात येते. कोरोनाच्या पूर्वी आम्ही आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता निर्माण करण्यासाठी शाळा, सरकारी कार्यालय व अन्य संस्थांमध्ये सक्रियतेने कार्य करीत होतो. भविष्यात एनडीआरएफच्या वाटचालीबद्दल बोलताना ते म्हणाले, १५३ एकरमध्ये एनडीआरएफचे विकसित ट्रेनिंग सेंटर दोन ते तीन वर्षात तयार करण्यात येईल. कोरोनापासून लोकांना सावधान करताना ते म्हणाले मास्क वापरण्याबरोबरच सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. एनडीआरएफला नैसर्गिक आपत्तबरोबरच रासायनिक,जैविक व रेडिओलॉजिकल व परमाणू युद्धात निर्माण झालेल्या आपत्तीच्या प्रसंगात तैनात रहावे लागते.