गस्तीवर असलेल्या पाेलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:09 AM2021-04-24T04:09:20+5:302021-04-24T04:09:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कुही : गस्तीवर असलेल्या पथकातील पाेलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची ...

Pushback to a patrol officer on patrol | गस्तीवर असलेल्या पाेलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

गस्तीवर असलेल्या पाेलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कुही : गस्तीवर असलेल्या पथकातील पाेलीस कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची घटना कुही पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील मांढळ येथे गुरुवारी (दि. २२) सकाळी ११ वाजता घडली. यातील आराेपीस अटक करण्यात आली असून, त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

रुपेश शामराव ईटनकर (२३, रा. मांढळ, ता. कुही) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. पाेलीस उपनिरीक्षक अनिल देरकर यांच्या नेतृत्वातील कुही पाेलिसांचे पथक गुरुवारी सकाळी रुयाड परिसरातील गस्त आटाेपून मांढळमध्ये दाखल झाले हाेते. ते मांढळ येथील बसस्थानक परिसरात आले असता, त्यांना रुपेश माेटरसायकलवर डबल सीट जाताना दिसला. पाेलिसांनी त्याला थांबवून विचारपूस केली. त्यावर ‘मी फार्मासिस्ट आहे. कुठेही फिरू शकताे’, असे उत्तर दिल्याने पाेलिसांनी त्याला ओळखपत्र मागितले. त्यावर तू दादागिरी लावली का, असे म्हणून रुपेशने उपनिरीक्षक अनिल देरकर यांची काॅलर पकडून त्यांना धक्काबुक्की व अश्लील शिवीगाळ केली. यात रुपेशने त्यांच्या वर्दीवरील नेमप्लेट ताेडली. तू मला त्रास दिला तर फार्मासिस्ट लाेकांना सांगून तुझी वाट लावताे व तुला पाहून घेईन, अशी धमकीही दिली. याप्रकरणी कुही पाेलिसांनी भादंवि ३५३, २६९, २७१, २९४, ३३२ तसेच साथराेग अधिनियम सहकलम २, ३, ४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा सहकलम ५१ (ब) अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी रुपेशला अटक केली. त्याची शुक्रवारी (दि. २३) नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक कमलेश साेनटक्के करीत आहेत.

Web Title: Pushback to a patrol officer on patrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.