शासकीय ठिकाणांवर काँग्रेस सेवादलाचे फलक लावा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 09:29 AM2020-11-22T09:29:54+5:302020-11-22T09:29:54+5:30
नागपूर : काँग्रेस सेवा दलाची स्थापना १९२३ मध्ये नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात झाली. नागपूरच्या ऐतिहासिक घटनाक्रमात याचा समावेश ...
नागपूर : काँग्रेस सेवा दलाची स्थापना १९२३ मध्ये नागपुरातील मध्यवर्ती कारागृहात झाली. नागपूरच्या ऐतिहासिक घटनाक्रमात याचा समावेश करून नागपुरातील विधान भवन, रविभवन, आमदार निवास व रेल्वे स्टेशनसह शासकीय ठिकाणांवर काँग्रेस सेवादलाचे फलक लावावेत, अशी मागणी काँग्रेस सेवादलाचे नागपूर शहर अध्यक्ष प्रवीण आगरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली.
काँग्रेस सेवादल ही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी स्वयंसेवक संघटना असल्याने व तिची स्थापना नागपुरात झाली असल्याने या घटनेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे आगरे यांनी सांगितले. शिष्टमंडळात विजय वाटकर, राजेंद्र भोंडे, चिंतामण तिडके, रवींद्र चौधरी, दिलीप गायकवाड, संजय अहेर, सतीश तलवरकर, अजय पावडे, संजय हांडे, सोहन सातपुते, जितेंद्र चोहान, लक्ष्मण बागडे, कल्पना बांगरे, सीमा चंद्रिकापुरे आदींचा समावेश होता.