प्रा. साईबाबावर सुपर स्पेशालिटीमध्ये उपचार

By Admin | Published: June 20, 2015 03:08 AM2015-06-20T03:08:23+5:302015-06-20T03:08:23+5:30

मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या प्रा. जी.एन. साईबाबाला पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात शुक्रवारी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सखोल वैद्यकीय तपासणी ...

Pvt. Sai Baba Super Specialty Treatment | प्रा. साईबाबावर सुपर स्पेशालिटीमध्ये उपचार

प्रा. साईबाबावर सुपर स्पेशालिटीमध्ये उपचार

googlenewsNext

सोमवारपासून रुग्णालयाच्या चकरा : कडेकोट बंदोबस्ताची चर्चा
नागपूर : मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या प्रा. जी.एन. साईबाबाला पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात शुक्रवारी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सखोल वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा कारागृहात नेण्यात आले. त्याची तब्येत उत्तम असल्याने कारागृहात परत नेण्यात आल्याचे समजते.
नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून प्रा.जी.एन. साईबाबाला अटक करण्यात आल्यानंतर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. पक्षाघाताच्या झटक्यानंतर त्याला ९० टक्के अपंगत्व आले व ते अंथरुणाला खिळून आहेत. विशेष म्हणजे, सोमवारी १५ जून रोजी मेडिकलच्या नेत्ररोग विभागात उपचारासाठी आणले होते. साईबाबाच्या दोन्ही डोळ्यांची तपासणी करण्यात आली. यानंतर मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात औषधशास्त्र विभागात प्रकृतीची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर लगेचच परत पाठविण्यात आले. गुरुवारी सकाळी सुसज्ज रुग्णावहिकेतून साईबाबाला धंतोलीतील न्यूरॉन रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु सायंकाळी पुन्हा कारागृहात नेण्यात आले. शुक्रवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास साईबाबाला सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या न्यूरोलॉजी विभागात आणण्यात आले. व्हीलचेअरवर असलेल्या साईबाबाच्या सभोवताल १५ ते २० पोलीस आणि कमांडोचा ताफा होता. त्याची तपासणी झाल्यानंतर पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले. साईबाबाला असलेल्या पोलीस व कमांडोच्या कडेकोट बंदोबस्ताची चर्चा रुग्णालयात दिवसभर सुरू होती.

Web Title: Pvt. Sai Baba Super Specialty Treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.