नागपूर वन विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 10:54 AM2018-08-08T10:54:13+5:302018-08-08T10:56:19+5:30

प्रादेशिक नागपूर वन विभागांतर्गत जंगलामध्ये अवैध वृक्षतोडीच्या दोन प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Question mark on the action of Nagpur forest department | नागपूर वन विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

नागपूर वन विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

Next
ठळक मुद्देखाप्यात २.५ लाखाच्या वृक्षतोडीवर आरएफओसह चार निलंबित कळमेश्वरमध्ये आठ लाख सागवान प्रकरणात केवळ कारणे दाखवा

योगेंद्र शंभरकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रादेशिक नागपूर वन विभागांतर्गत जंगलामध्ये अवैध वृक्षतोडीच्या दोन प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. गेल्या वर्षी ४ मार्च रोजी प्रादेशिक खापा वन परिक्षेत्रात २ लाख ५७ हजार रुपयांची आडजात वृक्षांची कटाई करण्यात आली होती. या प्रकरणात तीन महिन्यानंतर आरएफओ, फॉरेस्टर, वनरक्षकसह चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. दुसरीकडे कळमेश्वर वनक्षेत्रात झालेल्या आठ लाख रुपयांच्या सागवान कटाईत चार महिन्यानंतरही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. सूत्रांच्या महितीनुसार, कळमेश्वरच्या वृक्षतोडी प्रकरणात वन विभागाच्या व्हिजिलन्स टीमच्या चौकशीत हिंगण्याचे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी दोषी आढळले होते. परंतु या कर्मचाऱ्यांना केवळ कारणेदाखवा नोटीस बजावण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, खापा वनपरिक्षेत्रात जटामखोरा, मौजा कवठा येथे ७ सप्टेंबर २०१७ ला ६७६ आडजात वृक्षाची अवैध कटाई करण्यात आल्याचे प्रकरण पुढे आले होते. फॉरेस्ट मोबाईल स्क्वॉडने केलेल्या चौकशीत ३० घनमीटर लाकडांची कटाई झाल्याचा अहवाल दिला होता. यात २ लाख ५७ हजार ५८८ रुपयांचे नुकसान झाले होते. या अहवालावरून अवघ्या तीन महिन्यात खापा येथील तत्कालीन आरएफओ एस.व्ही. तागडेसह चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. परंतु कळमेश्वरच्या आरक्षित जंगलात हिंगण्याचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याच्या अनुमतीवर सागवानच्या ४०० वृक्षाची कटाई करण्यात आली होती. या प्रकरणात केवळ कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. अशाप्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेल्या दुटप्पी कारवाईची चर्चा विभागात आहे.

हिंगण्यात मंजुरी, कळमेश्वरमध्ये वृक्षकटाई
गेल्या वर्षी क ळमेश्वर, पांजरा गावात सातनवरी बीटला लागून शेती करणारे बळीराम भोयर यांनी आपल्या शेतातील ४०० सागवानचे वृक्ष कापण्याची परवानगी मागितली होती. तत्कालीन हिंगणा आरएफओने खसऱ्याची प्रत्यक्ष पाहणी न करता कटाईची अनुमती दिली. खसरा क्रमांक ७७ हा सातनवरी कळमेश्वर रेंजमध्ये आरक्षित जंगलाचा हिस्सा आहे. येथे सागवानाची वृक्षतोड होत असताना कळमेश्वरचे अधिकारी व वनकर्मचाऱ्यांचे लक्ष गेले नसेल का? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

Web Title: Question mark on the action of Nagpur forest department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.