ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

By admin | Published: January 22, 2017 02:15 AM2017-01-22T02:15:19+5:302017-01-22T02:15:19+5:30

एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात असा समज आहे.

Question mark on women's safety in rural areas | ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Next

बलात्काराच्या ६६ प्रकरणांची नोंद : हुंड्याने घेतला ६४ महिलांचा जीव
नागपूर : एरवी शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात महिला जास्त सुरक्षित असतात असा समज आहे. मात्र मागील वर्षभरात महिलांविरोधातील गुन्ह्यांच्या आकडेवारीने ग्रामीण भागातील महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात मागील वर्षभरात ६६ बलात्काराच्या प्रकरणांची नोंद झाली तर ६४ महिलांचा हुंड्याच्या कारणामुळे बळी गेला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे विविध गुन्ह्यांसंदर्भात विचारणा केली होती. नागपूर ग्रामीण मध्ये २०१६ मध्ये दरोडा, बलात्कार, चोरी, खून, विनयभंग इत्यादींचे किती गुन्हे दाखल झाले व किती आत्महत्या झाल्या यासंदर्भात त्यांनी प्रश्न विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत ग्रामीण भागात महिलांवर झालेल्या अत्याचाराचे ४१६ गुन्हे नोंदविण्यात आले. १७५ महिलांवर बलात्कार झाला तर २८ महिलांची ‘चेन स्नॅचिंग’ झाली. शिवाय अपहरणाचे १११ गुन्हे दाखल झाले. या कालावधीत ग्रामीण भागात चोरीच्या ९६५ प्रकरणांची नोंद झाली. तर खुनांचे प्रमाण ४५ इतके होते. या कालावधीत ४४ ठिकाणी जबरी चोरी झाल्या तर ४ ठिकाणी दरोडे पडले. विविध कारवायांमध्ये १ हजार ९४३ किलो इतरे अफू, गांजा तसेच इतर अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या मालाची किंमत १ कोटी ९३ लाख ७२ हजार ९७० रुपये इतकी होती. तर विविध अपघातांमध्ये ३७४ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.(प्रतिनिधी)

दिवसाला एक आत्महत्या
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या वर्षभरात थोड्याथोडक्या नव्हे तर ३६६ नागरिकांनी विविध कारणांमुळे आत्महत्येचे पाऊल उचलले. सरासरी प्रत्येक दिवसाला एका आत्महत्येची नोंद झाली. ग्रामीण भागात आत्महत्यांचे प्रमाण कमी असते असा समज आहे. मात्र ही आकडेवारी निश्चितच विचार करायला लावणारी आहे.
 

Web Title: Question mark on women's safety in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.