लसीकरण केंद्रावर रांगा; नागरिक गोंधळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:54+5:302021-05-10T04:08:54+5:30

-रविवारी शहरातील दहा झोनमधील दहा केंद्रांवर ४५ वर्षांवरील फक्त २४०८ नागरिकांना लस देण्यात आली. १८ ते ४४ वयोगटातील ...

Queues at the vaccination center; Civil confusion | लसीकरण केंद्रावर रांगा; नागरिक गोंधळात

लसीकरण केंद्रावर रांगा; नागरिक गोंधळात

Next

-रविवारी शहरातील दहा झोनमधील दहा केंद्रांवर ४५ वर्षांवरील फक्त २४०८ नागरिकांना लस देण्यात आली. १८ ते ४४ वयोगटातील ७१२ जणांना लस दिली.

- सोमवारी ३ मे रोजी ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली नाही. १८ ते ४४ वयोगटातील ६७० लाभार्थींना लस मिळाली. ६२० जणांना दुसरा डोस देण्यात आला. एकूण १७४१ डोस देण्यात आले.

- मंगळवारी ४ रोजी ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळाली नाही. १८ ते ४४ वयोगटातील ७०० लाभार्थींना लस मिळाली. एकूण १६४७ जणांना लस दिली.

- बुधवारी ५ मे रोजी ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण बंद होते. १८ ते ४४ वयोगटातील ८०४ लाभार्थींना लस दिली. एकूण १६८८ लाभार्थींना लस दिली.

- तीन दिवसाच्या ब्रेकनंतर गुरुवारी ६ मे रोजी ४५ वर्षांवरील नागरिकांना लस दिली. पुरेसा साठा नसल्याने ११,९०६ लाभार्थींना लस दिली. १८ ते ४४ वयोगटातील १६३८ लाभार्थींना लस दिली.

- शुक्रवारी ६ मे रोजी लसीकरण सुरू होते. १२,५४७ जणांना लस देण्यात आली. १८ ते ४४ वयोगटातील १६४५ लाभार्थींना लस दिली.

- शनिवारी ८ मे रोजी ४५ वर्षांवरील लसीकरण झाले नाही. फक्त २६९० जणांना लस दिली. यात १८ ते ४४ वयोगटातील १७३५ लाभार्थी होते.

- रविवारी लसीकरण सुरू होते. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणासाठी केंद्राची संख्या ६ वरून ९ करण्यात आली.

- सोमवारी पुन्हा ४५ वर्षांवरील लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली.

Web Title: Queues at the vaccination center; Civil confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.