मिहानमधील समस्या त्वरित सोडवा

By admin | Published: October 3, 2016 02:53 AM2016-10-03T02:53:49+5:302016-10-03T02:53:49+5:30

मिहानमध्ये कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांमध्ये नागपूरसह विदर्भातील बेरोजगार युवकांना नोकरीच्या संधी

Quickly solve the problem in Mihan | मिहानमधील समस्या त्वरित सोडवा

मिहानमधील समस्या त्वरित सोडवा

Next

आढावा बैठक : नितीन गडकरी यांचे निर्देश
नागपूर : मिहानमध्ये कार्यरत असलेल्या विविध कंपन्यांमध्ये नागपूरसह विदर्भातील बेरोजगार युवकांना नोकरीच्या संधी आणि उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) आणि कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची शनिवारी एकत्रित बैठक घेतली.
गडकरी यांनी उद्योगांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्यात आला. पोलीस चौकी, मोबाईल कव्हरेज, मिहान क्षेत्राचे सौंदर्यीकरण आदींसह अनेक समस्या सोडविण्याचे निर्देश गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
गडकरी यांच्या प्रयत्नामुळे दोन वर्षांत ३६ कंपन्यांनी नागपुरात उद्योग सुरू केले आहेत. टीसीएस, एअर इंडिया एमआरओ, टेक महिन्द्र, इन्फोसेप्ट, एमआरआर सॉफ्ट, फ्यूचर ग्रुप, टाल, पतंजली इत्यादी कंपन्यांचा उल्लेख करता येईल. आजपर्यंत एकूण ९ हजार ३७८ युवकांना मिहानमध्ये रोजगार मिळाला असून ४ हजार ९७६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती बैठकीत चर्चेदरम्यान मिळाली. दोन वर्षांत रोजगाराचा आकडा ५० हजारांवर जाणार आहे. कंपन्यांना कुशल कामगार मिळावेत म्हणून अनेक कंपन्यांनी वेगवेगळ्या स्तरावर प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे बेरोजगार युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होणार आहे. यासाठी नागपूर आणि विदर्भातील युवकांना संधी द्यावी, असे गडकरी यांनी बैठकीत सांगितले.
नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी गडकरी प्रयत्नरत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या प्रकल्पासाठी त्यांनी दोन वर्षांत २१ हजार कोटी रुपयांचा निधी खेचून आणला. बहुतांश कामे सुरू झालेली आहेत. मिहान प्रकल्प हा विदर्भाचा विकासाचा मार्ग ठरणार आहे.
मिहानमध्ये नवीन उद्योग यावेत, यासाठी गडकरी प्रयत्नरत आहेत. फूड पार्कमध्ये पतंजली तसेच रिलायन्स एरो स्ट्रक्चर्स, एचसीएल हे उद्योग लवकरच काम सुरू करणार आहे. या कंपन्यांमध्ये वैदर्भीय युवकांना रोजगाराच्या भरपूर संधी आहेत.
बैठकीत मिहानमध्ये कार्यरत सर्व कंपन्यांचे आणि मिहानचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Quickly solve the problem in Mihan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.